पान:इतिहास-विहार.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
केळकराचे लेख

निघालेली स्तुति किंवा आश्चर्याचे उद्गार खचित निघाले नसते अ आम्हांस तरी वाटतें !

 असो, प्राचीन वस्तुज्ञानाची आवड ही अशा रीतीनें स्वभावसिद्धच असली तरी ज्याला इतिहास-संशोधन म्हणतां येईल तें आधुनिक संस्कृतीचे फळ आहे ही गोष्ट वरील विवेचनावरून वाचकांचे लक्षांत आलीच असेल. आतां इतिहास संशोधनाचे जे काम गेल्या ३०-३५ वर्षातः महाराष्ट्रांत झाले, त्याचें थोडेंसें 'समालोचन करूं.

- २ -

इतिहास संशोधनाचे महत्त्वाचे असें काम जरी गेल्यां तीस पसतीस वर्षात विशेष झाले, तरी या संशोधनाच्या इतिहासाची पूर्वपरंपराहि थोड़ी- बहुत समालोचित करणें जरूर आहे. या पूर्वपरंपरेंत प्रथमतः बखरकारांचा परामर्ष घेतला पाहिजे. आपणांमध्ये पूर्वी ऐतिहासिक दृष्टि फारशी नव्हती, या सामान्य विधानाला जर थोडाबहुत अपवादात्मक विरोध होण्यासारखा असला तर तो बखरनविसांकडून. कारण त्यांचे कामच मुळ पूर्वकालीन वृत्तांत परंपरेनें व यथातथ्य नमूद करावयाचा हैं होतें. बखरी लिहिण्याची कल्पना मराठ्यांनी प्रायः तवारिखा लिहिणाऱ्या मुसलमानांकडून अनुकरण- प्रियत्वामुळे उचलली. पण तवारिखांप्रमाणेंच बखरींतहि, ऐतिहासिक, सत्याची छाननी चिकित्सक बुद्धीनें फारशी झालेली आढळत नाहीं: जे काय आढळतें तें हेंच कीं, बखरींतून बखरनविसांच्या पक्षाचा इतिहास, पूर्वीच्या दंतकथांवरून तिखटमीठ लावून, अलंकारिक भाषेनें, चटकदार, शब्दांनी पण स्वाभिमानपूर्णतेनें आणि अत्यंत सुरस रीतीनें असा वर्णिलेला असतो. इतिहास व ऐतिहासिक कादंबन्या यांच्या दरम्यान या बखरींत -स्थान देतां येईल, राजपुत्र व अमीरउमराव यांची तरुण पिढी यांना स्वदेशाच्या वृत्तान्ताचे शिक्षण देणें हा बखरींचा मुख्य उद्देश असे; यामुळे बऱ्याचशा बखरी राजाज्ञेनें किंवा निदान राजदरबारच्या आश्रयाने बखर- नवसांकडून लिहविल्या जात. महाराष्ट्राचे इंग्रज इतिहासकार यांनी