पान:इतिहास-विहार.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार

१२१

जमेल तिजपेक्षां या भूतकालीन कलेवराला पहाण्याला अधिक गर्दी लाटेल! "कौतुकाच्या दृष्टीने पहातां ब्रिटिश 'म्यूझियम' मधील इजिप्शियन 'ममी' ह्री ब्रिटिश साम्राज्याचा मुगुट धारण करणाच्या प्रत्यक्ष राजापेक्षां आपणास अधिक दर्शनीय वाटते" असें जर कोणी सांगितलें तर आम्हांस त्याचें कांहींच नवल वाटणार नाहीं ! पण हैं कौतुक झाले तरी असल्या वस्तूच्या दुर्मिळतेमुळेच होय हे विसरता कामा नये. " इतिहास संशोधनाचा हेतु अज्ञात अशी माहिती मिळविणे हा आहे खरा; पण इतिहास संशोधनाला जी खरी लज्जत येते ती केवळ असली माहिती दुर्मिळ म्हणून ! सर्व जुन्या काळचे जग अगदी आजकालच्या जगासारखे मनुष्याला कायमचें डोळ्या- पुढे दिसत असतें - तर त्याचे ज्ञानभांडार अर्थात् फारच वाढलें असतें. पण मर्माची गोष्ट अशी आहे कीं, मंग त्या ज्ञानाची त्याला फार किंमतहि . कांटली नसती ! आपल्या डोळ्यांसमोर पेढ्याबर्फीचे ढीगचे ढीग लागलेले असर्ता हलवायला त्यांतील एखादा तुकडा उचलून तोंडांत टाकावा असे कधींहि वाटत नाही. पण तोच मिठाईचा एखादा : चुकलामालेला तुकडा कुलूप लावलेल्या कपाटांत तावदानांतून मुलास अस्पष्ट दिसला तर त्याला त्याचें जें महत्व वाटतें व तो मिळविण्याकरितां तो जी धडपड करितो ती सांगतां पुखत नाहीं, जुनें हें कौतुकास्पद वाटते खरे, पण ते कां ? तर सर्वभक्षक असा काळ हा वस्तुमात्र खाऊन नाहींसें करितो. आणि केवळ भातुकलीच्या खेळांत जेवणारी मुलें जशी नखभर बानगी कोठें तरी लपवून ठेवितास तशा प्राचीन व ऐतिहासिक स्मृतीच्या केवळ वानगीदाखल : काळ हा किरकोळ थोड्याशा जिनसा कोठें रखूं देतो- म्हणून ! श्रीकृष्णाने अर्जुनाला अनंत कोटि ब्रह्मांडें समाविष्ट झालेल्या विश्वाच्या रूपाचें दर्शन करविलें, तेव्हां तो अद्भुत रसामध्यें नखशिखांत बुडाला हे खरे; पण तो दिव्य 'देखावा' केवळ क्षणिक व दुर्मिळ होता म्हणून ! उदात्त असाहि तो देखावा' श्रीकृष्णानें जर अर्जुनास कायमचाच मिळवून दिला असता, आणि घरच्या कपाटात ठेविलेल्या ताजमहालाच्या संगमरवरी प्रतिमेकडे - आपुणॉस मनांत येतांच वाटेल तेव्हां पढ़ाता येते इतकें सुलभ जर अर्जुनाला विश्वरूपदर्शन झाले असले, तर त्याच्या तोंडून