पान:इतिहास-विहार.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
केळकरांचे लेख

राष्ट्रांतील लोकसुद्धां इतिहास संशोधन करितात तें कां १ इंग्लंडच्या ऐतिहासिक ग्रंथांतून आज आठ-आठशे, हजार-हजार वर्षापूर्वीचे लेख उतरलेले वाचावयास आणि संग्रहालयांतून पहावयास मिळतात. इंग्लंडां "तील लोकांना वैभवाच्या दृष्टीने आज जुन्या काळाकडे पाहण्याचें कारण नाहीं.. तरी पण जॉन राजाने तेराव्या शतकांत आपल्या प्रजेस दिलेली. मर्यादित स्वातंत्र्याची सनद पाहून त्यांना कौतुक वाटतेंच. इ. स. ५९७ साली एदल्बर्ट नामक सॅक्सन्- राजानें आपल्या हातानें लिहिलेले पत्र किंवा अॅग्लो सॅक्सन् कवींचे सर्वात जुने उतारे अशा वस्तूंची संग्रहालयांतून देवळांतल्या मूर्तीप्रमाणे जोपासना, पूजा व अर्चा केलेली आढळते ती काय म्हणून १ अर्थात् इतिहास संशोधनाच्या आवडीमुळेच त्याशी राजकीय उन्नति अगर अवनति यांचा संबंध नाहीं. सतराव्या शतकापूर्वी युरोपांतील लोकांना आणि एकोणिसाव्या शतकांतील हिंदुस्थानामधील लोकांना परं परेची आवड सारखीच होती. पण ऐतिहासिक दृष्टीची वाणहि दोघांमध्ये सारखीच होती हीच गोष्ट निर्विवाद होय. हल्लीं सुदैवानें पाश्चात्य शिक्षणा च्या योगानें ही दृष्टि आपणांस आलेली आहे. ब दुर्दैवानें त्याच वेळी जुन्या राष्ट्रीय वैभवाकडे पाहून भूक निवविण्याचीहि वेळ आलेली आहे. असा योग जुळला ही गोष्ट मात्र निराळी..!

 इतिहास संशोधनाची आवड. मनुष्यमात्रास दोन हेतूंनी उत्पन्न होते... एक तर भूतकालीन माहिती ही कल्पनानिर्मित चित्रविचित्र रंगांनी रंगविलेल्या आणि अद्भुतरम्य अशा वस्त्रांनी नटविलेल्या व्यक्तींचें व समाजरचनेचें चित्र डोळ्यांपुढे उभे करते व त्यांतल्या त्यांत पहावयाचें तर दुसरे कारण असें कीं, गतकालीन माहिती मिळू शकते ती. स्वभावतःच थोडी व दुर्मिळ असते. आपल्या भोंवतीं चालू व्यवहारांत आढळणाऱ्या अशा ज्या क्षुद्र गोष्टींकडे आपण कधीं ढुंकूनहि पहाणार नाहीं, त्यांजवर केवळ गतकालीनत्वाचा सोनेरी भुलामा चढल्यामुळे त्या संग्रहणीय, मननीय व कौठुकास्पद ठरतात. आम्हांस तर कित्येक वेळा असें वाटतें की, केवळ जुन्या काळच्या पण अगर्दी नादान अशा एखाद्या मनुष्याचें शरीर पेंढा भरल्यामुळे जतन होऊन राहिलेले जर आज यदृच्छेने उपलब्ध झाले, तर वर्तमानकाळच्या सर्वमान्य व सर्वोत्तम अशा व्यक्तींना पहाण्याला जी गर्दी