पान:इतिहास-विहार.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार

११९

म्हणतो तिचें तेव्हां अस्तित्वहि नसल्यामुळे, स्थानिक व सार्वदेशीय इति- हास आणि मनुष्यसमाज यांचे जे निरनिराळे संबंध आधुनिक दृष्टीला दिसतात ते तेव्हां दिसत नसल्यामुळे, इतिहाससंशोधनाची विद्याच मुळी त्या वेळी जन्मास आली नव्हती, असे म्हटले तरी चालेल.

 वास्तविक आम्हांला आज पेशव्यांचा काळ जितका जुना तितकाच जवळ जवळ पेशवाईतील लोकांना शिवाजीप्रभृतींचा काळ जुना. दोषांनाहि या दोन्ही काळांचे सारखेंच कौतुक वाटावयास पाहिजे, आम्हीच तेवढे आज परंपरेचे 'अभिमानी आहो आणि पेशवाईतील लोकांना मात्र प्राचीनपरंपरा प्रिय नव्हती असे मुळींच नाहीं. आज नाना फडणविसांच्या हातचा लेख पाहून आम्हास जितका आनंद होतो तितकाच आनंद नाना फडणविसांसहि शिवाजीच्या हातचा लेख पाहून वंचित झाला असता. पण जितक्या उत्सुकतेने नानांच्या व त्यांच्या बरोबरीच्या लोकांनी लिहिलेले कागदपत्र आम्ही आज जतन करून ठेवितों, तितक्या उत्सुकतेनें शिवकालीन पत्रव्यवहार जतन करून ठेवण्याची इच्छा व कळकळ नानाफडणविसांच्या काळच्या लोकांना कदाचित् असेल; पण ती असल्याचा मात्र उल्लेख कोठे दृष्टीस पडत नाहीं. यावर कोणी कदाचित् असें म्हणेल कीं, जिवंत राष्ट्राला इतिहास-संश धनाची आवश्यकता काय ? इतिहास निर्माण करण्यापुढे इतिहास संशो- काय किंमत ? पण या प्रश्नांत फारसा अर्थ नाही. कारण एक तर सत्यज्ञान हैं फक्त मृत किंवा मुमूर्षु म्हणा-राष्ट्राचे औषध किंवा अन आहे असे विचारांत कोणासहि म्हणतां यावयाचे नाहीं. जिवंत राष्ट्रासहि तैं उपयोगी पडेलच. कारण पूर्वपरंपरेचा अभिमान हा मुमूर्षु राष्ट्रास काय किंवा सजीव राष्ट्रास काय दोघांसहि सारखाच प्रिय असतो. मुमूर्षु राष्ट्राला तो भावी आशेचा आधार म्हणून प्रिय असेल, तर सजीव राष्ट्राला तो आपल्या वैभवाचें प्रतिबिंब म्हणून आवडेल; पण कोणत्याहि दृष्टीने का होईना परंपरेचा अभिमान हा सर्वोसच प्रिय असतो.

 आज आम्ही महाराष्ट्राचे लोक खालावलों म्हणूनच आम्हांला इतिहास- संशोधनाचा चाळा आवडतो असें जे म्हणत असतील त्यांना एका प्रश्नाचे उत्तर देणे अवघड जाईल; तो प्रश्न हा कीं, ज्यांचा आजचा काळ चालता आहे - किंबहुना जीं राष्ट्रे आज ऐश्वर्यशिखरास पोचली आहेत अशा