पान:इतिहास-विहार.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार

११७

त्सकबुद्धीस विरोधी व विघातक आहे, अर्थात् जोपर्यंत कोणतेंहि धर्मग्रंथ - बचन म्हटलें म्हणजे तें सारर्खेच प्रमाण मानले जावें तोपर्यंत- कालाच्या दृष्टीनें तें अलीकडचें का पलीकडचें यांचा निश्चय करण्याची अपेक्षा नसते. अज्ञान - निदान गूढार्थप्रियता - हा श्रद्धेचा पाया, किंवा श्रद्धेचें तैः खाद्य असल्यामुळे एखाद्या धर्मग्रंथवचनाचा कर्ता कोण होता व त्याची सापेक्ष योग्यता कोणती हे ठरविण्याच्या भरीस पडून आपली श्रद्धा कमकुवत कोण करणार? आतां इतिहास ही चीज पूर्वी आपणांस माहीत नव्हतीच असें नाहीं. वैदिक काळी यज्ञ, वगैरे प्रसंगों, पुराण, इतिहांसनाराशंस इत्यादिक्रांची निरूपणे होत असत असें दिसतें. तथापि, ती फार तर उदात्त काव्यबुद्धीने किंवा श्रद्धालु, धर्मबुद्धीने प्रेरित झालेली असत; त्यांत सूक्ष्म ऐतिहासिक, अशी बुद्धि फारशी नसे असे म्हणण्यास हरकत नाही.

 शब्दप्रामाण्याच्या बुद्धीचें अस्तित्व व इतिहासाचा अभाव यांची व्यामि आपल्याकडेच दिसून येते असें मात्र नाहीं.. युरोप खंडांतहि जुन्या काळी अशीच स्थिति होती. म्हणजे शब्दप्रामाण्याचा इतका जोर होता की, जें जें म्हणून कागदावर लिहिलें गेलें तें तें खरें असलेच पाहिजे असे मानणारे लोक फार असत. आमच्याकडे जशी व्यासाच्या नांवावर बाटेल ती बोडे दडपली.जातात, तशींच युरोपांतहि मोठ्या व सुप्रसिद्ध ग्रंथकाराचे नांवानें काय वाटेल तें कोणा वाटेल त्यानें लिहावें; व केवळ तें लेखणीनें आणि शाईने कागदावर लिहिलें एवढ्याकरितां लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा, अशी पद्धत दोनतीनशे वर्षापूर्वीपर्यंत होती. सर्व विद्या धर्मनिष्ठ मठाधिपतींच्या हातीं, आणि हे मठाधिपतिः पहावे तर धर्मभोळे पणाच्या धुमीनें अर्धवट, आंधळे झालेले. एकटा सेंट ऑगस्टाईन घेतला तर त्याच्या मतवर्चस्वामुळे युरोपांत एक हजार वर्षेपर्यंत शब्दप्रामाण्याने इतका धुमाकूळ माजविला होता की, व्यवहार, इतिहास, राजकारण अशा गोष्टींकडे चिकित्सक, बुद्धीनें ढुंकून पाहण्याचे धाडस कोणासहि करवत नसे, जो कांहीं व्यवहार व इतिहास, किंवा जे कांहीं राजकारण, लोकांच्या लागी होतें तें धर्माच्या अधिराजाच्या परवानगीनें ! कोणत्याि महत्त्वाच्या किंवा किरकोळ गोष्टींचेहि कारण शोधावयाचें तर ते धार्मिक भोळेपणाच्या मळलेल्या मार्गानें ! खऱ्या भक्तीचा उदय मनांत नसतां