पान:इतिहास-विहार.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
केळकरांचे लेख

ठेवण्याच्या हेतूने नवे लेख कोरीत, पण आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या इतर राजे लोकांनी कोरलेल्या अशाच प्रकारच्या ---लेखांचे ऐतिहासिक- दृष्ट्या ते कितपत कौतुक करीत असतील हे सांगवत नाही. खासगी लोकहि राज लोकांपासून लाभणारे अग्रहार, देणग्या, इनामें, वतनें वगैरेंच्या शाक्तींकरितां ताम्रपट व सनदा मिळंबीत व त्या मोठ्या काळजीने जतनहि करीत. परंतु अशा प्रकारचे जुने ताम्रपट वगैरे मिळाले असतां त्यांना ते इतिहासाची साधने म्हणून मौल्यवान वाटत की नाही हे सांगतां येत नाही. क्तिनाचा पुरावा म्हणून ताम्रपटाची किंमत पूर्वी वाटत असेल यांत शंका .नाही, पण वतनाचा संबंध कांहीं एक नसतांहि केवळ ताम्रपटाचीच म्हणून -जी किंमत आज आपणांस ज्या दृष्टीने वाटते ती किंमत त्या दृष्टीने पूर्व- कालीन लोकांस वाटत नसावी अशी शंका येते.

 यास सकृद्दर्शनी दोन कारणं दिसतात... एक असें कीं, कालमापनाव - त्यामुळे अनुभवास येणारा वस्तुमात्राचा पूर्वापर संबंध याची जाणीव पूर्वी फारशी नव्हती. चित्रकलेप्रमाणे इतिहासांतहि प्राचीनांस यथास्थितिदर्शनाची गोडी माहीत नव्हती. रंग व रूपरेखा यांच्या दृष्टीने पाहतां आमच्या जुन्या काळच्या तसबिरी फारच उत्कृष्ट व सफाईदार असत.पण अंतरामुळे वस्तूंचे आकार डोळ्यास लहान मोठे, कसे भासतात हैं: सृष्ठी- मध्ये त्यांना नित्य पाहण्यास सांपडत असतांहि चितारी लोक तसबिरीमध्यें तो भास उमटवीत नसत. त्यामुळे उंच ब्रे सखल, अलीकडचे व पली- कड़वे यांचे डोळ्यांना दिसणारे सापेक्ष आकार बाजूला ठेवून, वस्तुमात्रांनी - होणारा दृष्टीचा अन्याय दूर करण्याकरितांच की काय, ते जवळच्या आणि दूरच्याहि वस्तु तसबिरींत सारख्याच आकाराच्या काढीत असत. है 'पर- क्टिव्ह' वें ज्ञान नसल्यामुळे चित्रकलेत आमासाच्या सुखाची जशी हानि होते तशीच इतिहासांत सत्याची हानि होते. कालमापन किंवा पूर्वापर निर्णय इतिहास रूपी लोकरी वस्त्राला आडव्या उम्या घाण्यासारखी होयः इतिहास कितीहि अद्भुत किंवा सरस असला तरी तो कालमानाच्या या मान्यी कुभ्या दोन्यांच्या आधाराव्यतिरिक्त राहूच शकत नाहीं. कालमानाच्या अभावाच्या दोषाला. शब्दप्रामाण्यबुद्धीच्या दोषानें पडली तर थोडीबहुत भरच पडली असें म्हणण्यास हरकत नाहीं. शब्दप्रामाण्यबुद्धि ही विकि-