पान:इतिहास-विहार.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार

महाराष्ट्रीय इतिहासाच्या संशोधनाचे काम आज सुमारें तीस पसतीस वर्षे हळुहळू चालू आहे. तथापि त्या कामाला आजवर संघटनेचे स्वरूप आलेले नसल्यामुळे, खुद्द महाराष्ट्रीयांवरहि त्याचा ठसा फारसा उमटलेला . दिसत नव्हता; मग इतरांवर तो उमटण्याची गोष्टच नको. पण सुदैवानें - पुण्यास गेल्या चार वर्षापासून 'भारत - इतिहास-संशोधक मंडळ' स्थापित झाल्यामुळे ही उणीव अंशतः तरी भरून निघण्यांचा बराच रंग दिसतो. . लोकांच्या मनावर ठसा उमटण्यापेक्षांहि अधिक महत्त्वाचा असा एक परि- णाम अशा संघटनात्मक कार्यापासून होण्याची अपेक्षा असते; कहा · परिणाम म्हटला म्हणजे कार्याची परंपरा चालू राहणें. 'भारत-- इतिहास- 'संशोधक' मंडळामुळे ही अपेक्षा देखील सफल होण्याचा संभव दिसतो; आणि गेल्या आठवड्यांत या मंडळाचें संमेलन झाले होतें त्याची केसरीत - दिलेली हकीकत ज्यांनीं वाचली असेल त्यांना महाराष्ट्राच्या प्रगतिपर चळवळींत एका नवीन व उपयुक्त संस्थेची भर पडली असे वाटून आनंद झाल्याशिवाय रहाणार नाहीं. 'इतिहास - संशोधन' हें कांहीं अंशी आधुनिक संस्कृतीचें एक फळ आहे ही गोष्ट नाकबूल करण्यांत फारसा अर्थ नाहीं; व तिचे बरेचसे श्रेय इंग्रजी शिक्षणाला दिले पाहिजे. इतिहास हा विषय जरी आपल्याकडे सर्वस्वी नवीन नाही तरी इतिहासाकडे पहाण्याची जी दृष्टि आपणांस आली आहे ती सर्वस्वी नवीन आहे. पूर्वी आपल्याइकडे लेखनपरंपरेपेक्षां मनपरंपरेलाच अधिक मान असे. पूर्वी विद्या आमच्या स्वाधीन होती, पण ती हस्तगत नसून कंठगत होती. तसेच लेख जुना म्हणून जतन करून ठेवण्याची चाल असली तरी तींत सार्वजनिक हितबुद्धीपेक्षां वैयक्तिक हितबुद्धिच अधिक असे. जुन्या काळींहि लेख सुरक्षित ठेवले जात; पण त्यांचा हेतु इतिहास संग्रह हा नसे, जयस्तंभ, देवळांतील दीपमाळा, ध्वज- स्तंभ, विहार, स्तूप, प्रासाद वगैरे ठिकाण राजे लोक आपली कीर्ति मागें


• तारीख २ जून १९१४