पान:इतिहास-विहार.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
केळकरांचे लेख

केलेली वर्णने वाचून अनेक विचारतरंग हृदयांत एकदम थरारतात.. 'पुण्यावर असे प्रसंग म्हणजे दोन वेळ झालेले आहेत. वर वर्णन केलेला. प्रसंग पुण्याच्या इतिहासांत पहिला होय. दुसरा प्रसंग दुसऱ्या बाजीरावाचे कारकीर्दीत होळकरानें आणला.

 असो. येथवर ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण यथामति करून् त्याच्या अनुषंगानें एकंदर मराठी इतिहासाचे उद्धाराविषयीं सुचले ते. दोन शब्द सांगितले. : ऐतिहासिक लेखसंग्रह हें मासिक पुस्तक ऐतिहासिक दृष्टाः किती महत्त्वाचे आहे हें यावरून दिसून आलेच, असेल. आतां तें व्हावें तितकें मनोरंजक होत नाहीं व त्यामध्ये पोवाड़े, दंतकथा, वगैरे गोष्टी येत नाहींत असा या मासिकपुस्तकावर आक्षेप कचित् कोणी करितांना आम्हीं ऐकलें आहे. त्यावर आमचें इतकेंच म्हणणं आहे कीं, ह्रीं पत्रे मनोरंजक व सुबोध व्हावीं याजकरितां रा. खरे यांनी आपणाकडून किती प्रयत्न केला आहे हे त्यांनी दिलेल्या विपुल. टीपा वगैरेंवरून दिसून येईल. इतिहास या दृष्टीने जर कोणी ती बाचील तर त्यांस कादंबरीपेक्षांही तीं अधिक चटकदार वाटतील असें आम्ही स्वानुभवावरून सांगतो. पोवाडे वगैरे इतर प्रकारचीं इतिहासाची साधनें सदर मासिक पुस्तकांत येत नाहींत हें खरें, परंतु सर्वच गोष्टींचा एकालाच पत्कर घेता येणार नाहीं ती उणीव इतर लोकांनी खुशाल भरून काढावी व तसे करण्यास त्यांस इतर मासिक पुस्तकांचें द्वार मोकळे आहे.