पान:इतिहास-विहार.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शनिवारवाड्याचा जीर्णोद्धार

जी सुसंस्कृत मनाला योग्य अशी मार्मिक बुद्धि दाखविली तिचें आम्ही आनंदानें अभिनंदनच करतों. पण या जीर्णोद्धाराच्या कामी केवळ सरः कार सर्व खर्च करण्याला तयार असले तरी तो त्यालाच करूं देणें हें आमच्या संस्थानिकांना व सरदारांना शोभणार नाहीं. म्हणून त्यांनीहि या कामी शक्य असेल ती मदत करावी असे कोणासहि वाटेल.

 असो ! प्राचीन वस्तुसंशोधक खात्याकडून जीर्णोद्धाराचे काय काम झाले च त्याने वाड्याची नवीन माहिती काय मिळाली वगैरे गोष्टींचा पूर्वापार वृत्तांत पुढील लेखांत आम्ही देणार आहों.

-२-

श निवारवाड्यासंबंधानें जुन्या कागदपत्रांतून एके ठिकाणीं समझ दिलेली अशी माहिती मिळत नाहीं, परंतु यत्नपूर्वक अनेक कागद- पत्रांतून मिळविल्यास चालचलाऊ माहिती मिळते, ती थोडक्यांत खाली देत आहों.

 पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीच्या प्रारंभी पेशव्यांची कायमची वस्ती पुरंदरास असून पुण्यास ते फक्त जाऊनयेऊन राहत. १७२१ साली बाजी - रावानें बापूजी श्रीपत याजकडे पुण्याच्या सुभेदारीचे काम सांगितलें. बापूजी- वा कारभारी रंभाजी जाधवराव याने उदमी लोकांना कौल देऊन पुण्यांत अमदानी करविली. नंतर पेशवे व पुरंदरे या उभयतांना पुण्यास कायमची वरती करण्याचे योजिलें, पैकीं पुरंदऱ्यांकरितां नदीकाठी अरबांची गढी किल्ले हिसार नांबाची होती ती मोडून मैदान केलें (सन १७२८), व त्यांत पुरंदरे यांचा वाडा बांधला. पुरंदऱ्यांच्या माडीवरून सन्मुख दिसेल अशा जवळच्या म्हणजे हल्लींच्या ठिकाणीं पेशव्यांनी आपला वाडा बांधला. या ठिकाणी कसब्याची मावळवेस होती तिच्याजवळ कोळी व कोष्टी लोकांची वस्ती होती, त्यांना मंगळवार पेठेत मोबदला जागा देऊन ही जागा वाड्याकरितां घेतली,: वाडा बांधण्यास वा. १० जानेवारी सन १७३० रोजी सुरुवात झाली. वाडा तयार नसल्यामुळे जुन्या कोटांत मंडप