पान:इतिहास-विहार.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केळकरांचे लेख

लाभेल. कारण हे सरदार, संस्थानिक व शनिवारवाडा यांचा संबंध किती प्राचीन व जिव्हाळ्याचा आहे हैं कोणास हि नव्याने सांगण्याचें कारण नाहीं. या बहुतेकांचे राजकीय व ऐतिहासिक वैभव या वाड्यांत लहानाचे मोठे झालें व सन्मान पावलें. त्यांच्या पूर्वजांनी सन १७३० पासून पुढील सत्तर वर्षांत ज्या कामगिया केल्या व महाराष्ट्राच्या इतिहासांत भर घातली त्यांचा परामर्ष येथेच घेण्यांत आला. त्यांची कारवाई येथेच घडली व त्यांच्या मुत्सद्देगिरीचा विजय हि येथेच झाला. लोण घेऊन येणाऱ्या गड्याने हांक मारली असतां पाटीवाल्याला जसे सक्तीने तोंड फिरवावें लागतें तसें दैवहि इतिहासाचें तोंड फिरवून जुन्याचा विसर पाडते; व जी गोष्ट अदृश्य विधि अमूर्त हातांनी घडवून आणतो तिची साथ करण्याकरितांच कीं काय अग्निप्रलय देहि अवतरून जुन्या वास्तू जाळून पोळून, पाडून नष्ट करून टाकीत असतो. आज हिंदुस्थानांतील लोकांच्या वैभवबुद्धीवर पडलेली जळिताची राख जशी स्वदेशाभिमानाच्या सोसाट्याच्या वाऱ्यानें पार उधळून जात आहे आणि आंतील महत्त्वाकांक्षेची रचना दृष्टीस पडूं लागली आहे, त्याचप्रमाणें शनिवारच्या वाड्यांतील मातीचे डोंगर प्राचीन वस्तुसंशोधक खात्याच्या प्रयत्नानें उकरून निघून जुन्या इमारतीचे अवशिष्ट दृष्टिगोचर होऊं लागले आहेत. अशा वेळीं राजेरजवाड्यांनी व इतर सरदारांनी मनावर घेतल्यास संयुक्त बलान त्यांना हें जीर्णोद्धाराचे काम सहज पार पाडतां येईल. हैं कार्य वास्तविक सर्व सरकारच्याहि खर्चाने होणे गैर नाहीं, उलट योग्यच आहे. कारण ज्या मराठेशाहीचें पांच कोटींचें राज्य इंग्रज सरकारला मिळालें तिचें हैं लहानसें दगडाविटांचे स्मारक शाबूत ठेवण्यास त्यांनी जरूर तो सर्व खर्च केला तर तें योग्यच होईल. पण कुटिल राजकारणी दृष्टीने पाहतां कोणी असाहि प्रश्न विचारू शकेल कीं, प्रतिपक्षाच्या गतवैभवाची तरी आठवण सरकारने जगाला काय म्हणून करून द्यावी ? पण सुदैवानें ब्रिटिश सरकारच्या राजनीतिींच्या विषारी जंगलांत प्राचीनवस्तु संशोधकबुद्धीची सुवा- सिक. मंजरी एकादे ठिकाणी तरी फुललेली आढळते, व ती ज्या ठिकाणी आढळेल तेथे निर्विकार मनानें तिचें चजि. करणें हेंच माणुसकीस शोभणारें आहे. या दृष्टीने पाहतां सर जॉर्ज लॉईड यांच्या इतर अनेक कृत्यांचा आम्हाला निषेध करावासा वाटत असला तरी या एका बाबतीत त्यांनीं