पान:इतिहास-विहार.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचे परीक्षण

११३

असल्यानें इतर गोष्टींकडे पाहिजे तितके लक्ष राज्यकत्यास द्यावयास सांपडलें नाहीं.

 आतां कोणतेंहि राज्य स्थापन होण्याचे वेळी साधारणतः असेच असावयाचे व पेशवाई आणखी कांहीं दिवस टिकती व इंग्रजासारख्या परशत्रूशीं त्याची गांठ इतक्या लवकर न पडती तर सर्व दंगाधोपा क्रमानें - मोडून जाऊन राज्यसुधारणा अधिक झालीच असती असेही एक म्हणणे आहे व तें विचार करण्यासारखे आहे. ऐ. ले. संग्रहांतील पत्रांचे काळी सर्वत्र दंगाघोपा होता ही गोष्ट मात्र खरी आहे व ती आम्ही येथे नमूद करितों. पेशवे मोंगलांच्या मुलखांत शिरून लुटालूट करीत चालले व पुढे राक्षसभुवनाच्या लढाईमध्ये मोगल होता की नव्हता 'असा त्यांनी करून टाकिला. यामुळे पेशव्यांचे राज्यास बढती व कीर्तीस उजळा मिळाला हे खरें, तथा पित्याच्या पश्चात् मोंगल पुण्यावर आले व शहराच्या बचावाची तरतूद नीट नसल्याने खुद्द पेशव्यांची राजधानी लुटली गेली व लोक प्राणरक्षणार्थ वाट फुटेल तिकडे पळत गेले, हि विचार करण्यासारखे आहे. पुणेशइस्वी लूट व जाळपोळ यासंबंधाची ऐले संग्रहांतील पत्र त्यांतील सविस्तर व स्फुट वर्णनामुळे फारच मनोरंजक आहेत. (पत्रे नंबर २१, २५९, २६०, २६१, २६२) " पाणी केळीवर नारळी चढतीत 'पृथ्वीप्रय मांडला आहे. " " यांत जोबांचे तो आपले प्राकनानुरूप वांचो," असे सरदारांचे उद्गार ब त्याचप्रमाणे " दादा, पुण्यातील देव एक लहानमोठा राहिला नाहीं. महादेवाच्या पिंडी व मूर्ति, गणपती, हणमंत सर्व फोडले. पर्वतीस हेंच केलें. सरकारचा वाडा, धर्मशाळा जळल्या. सिंहगडचे सरकारखाने गरीब- गुरीब व घेणाऱ्याचे गांव सात आठ, आजी रविवारी दोन प्रहरीं येऊन आगी दिल्या. तोफखान्याचे पानशांचे घराजवळ आग लाविली, तों श्री नागझरीस येऊन पोहोंचली. सोमवार-मंगळवारांत पांच सात हवेल्या जाळल्या. लोहगडचे माचीस वित्तविषय घेऊन पुण्याचे लोक राहिले होते त्यांस देखील लुटोन फरत केलें. नानाफडणवीस देखील एका वस्त्रानिशीं गडावर गेले. " व अखेर " रुपये ( खंडणी ) कबूल करून शेवटी अन गांवची राहिली नाहीं." अशी नारो आप्पाजीसारख्या शहरच्या कोतवाल ने