पान:इतिहास-विहार.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
केळकरांचे लेख

राजा हस्तगत करून देतो. याखेरीज वीस लाख रुपये मिळवून देतो. त्या उपरी राजगृहींचीं पदे आपले चित्तास येईल त्याप्रमाणे वांटून द्यावी ( पत्र १८३ ) असे प्रतिनिधींचा मुतालीक गमाजीबाबा यानें भोंसल्यास, कबूल करून त्याची फौज सातान्यास आणण्याचे तो मसलतीत होता. मराठी राज्याचा पाया बळकट करण्यास श्रीशिवाजीमहाराजांनी जे नियम बांधले होते, त्यांचा अम्मल . सर्वांनीं एकदिलाने व इमानाने करण्याचें तर एकाच बाजूस राहिले, परंतु आश्चर्य हें कीं, या वेळच्या मराठे सरदारांनी श्रीशिवाजीमहाराजांचे विस्मरणच पडलें असावें असा मास होतो आणि खरोखरच या इतक्या मंत्रांत सुखाचे किंवा दुःखाचे उद्गारांत मराठे सरदारां कडून शिवाजीमहाराजांचें नांव सुद्धां कोठें काढलेले आढळून येत नाहीं, ही गोष्ट ध्यानांत धरण्यासारखी आहे. शिवाजीमहाराजांची जर या वेळच्या मराठ सरदारांना आठवण असती तर त्यांचेकडून सातारच्या गादीशीं अशी वर्तणूक खास झाली नसती.. अशा रीतीनें स्वराज्याच्या अभिमानापेक्षां स्वार्थपरायणता अधिक प्रबळ झाल्यामुळे निरनिराळ्या दिशेने ओढणया शक्ति प्रबळ झाल्या व अर्थातच मराठेशाहीची घडी विस्कळीत झाली. राज्यांत शिस्त उरली नाहीं व " ज्याचे पदरी फौज त्याची पृथिवी " या गोविंद हरीचें म्हणीप्रमाणे ( पत्र १११ ) केवळ लष्कराचे जोरावर राज्याचें, धोरण बनूं लागलें, व शिपाईगिरीपुढे मुत्सद्दीपणाचें कांहीं चालेना... वास्तविक त्या काळी पूर्ण स्वराज्य व शिपाईगिरीस भरपूर उत्तेजन या दोन कारणांनी जवळ-जवळ सर्व राष्ट्र लढवय्यें बनून गेलें होतें. परंतु मध्यवर्तिः व नियामक अशी राज्यसत्ता प्रबळ नसल्यानें प्रजेच्या लष्करी गुणांचा उपयोग राज्याचे एकीकरणाकडे झाला नाहीं ही दुःखाची गोष्ट आहे. पेशवे व मराठेसरदार यांजमध्ये वास्तविक सैन्यसेवक भाव जागरूक असा aa नव्हताच. त्या परस्परांमध्ये लढाया, तह, जामिनक्या वगैरे होत असत.. पेशव्यांची कामगिरी बनवावयाची असतां होळकरासारखे सरदार अडून बसत व त्रिकट प्रसंगाचा फायदा घेऊन त्यांजपासून मोठमोठ्या जहागिरी तोडून घेत ( पृष्ठ ३००) तात्पर्य, अशा रीतीन पेशवे लष्करी कारभारांतच बहुधा गुंतले असल्यामुळे व एकंदरीने सो काळ धामधुमीचा