पान:इतिहास-विहार.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

१११

सणसणीत पत्र प्रत्यक्ष आईचें आल्यावर गोपाळरावाने जाऊन स्वतः सः नापसंत अशाच मुलीशी लग्न केलें, ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे.

 आतां १४ अंकांतील पत्रांवरून त्या काळची लोकस्थिति कशी दिसून येते हें आपण पाहू. पानपतची लढाई व त्यामुळे पुढे लवकरच घडूतः आलेला नानासाहेब पेशव्यांचा मृत्यु यामुळे पेशवाईस ग्रहण लागण्याची/ वेळ आली होती, परंतु पूर्वी संभाजीमहाराजांचे वधानंतर संताजी घनाजींनी ज्याप्रमाणे मराठेशाही महापराक्रमानें वांचविली.. त्याचप्रमार्णे माधवराव पेशवे, होळकर, शिंदे व पटवर्धन सरदार यांनीहि मराठ्यांची गेलेली कीर्ति परत मिळविली, व मराठी राज्य वाढविले. खच्ची केलेल्या झाडाप्रमाणे मराठेशाहीस जास्तच जोर चढला, तथापि यानंतरचे मराठे- शाहीचे वैभव दिपविणारे होते तरी फार वेळ टिकाऊ, असें नव्हतें. कारण मराठी राज्याचे आधारस्तंभ जे मराठे सरदार यांची घडी पानपतचे युद्धांपूर्वी होती तशी टिकली नाहीं, जो तो स्वतंत्र होऊन बसला. खुद्द पेशव्यांनींच या बाबतीत वाईट उदाहरण घालून दिले होते. सातारकर महाराज, मराठी राज्याचे खरे मालक हे सातारा किल्लयांत कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नामधारी राजे होऊन राहिले होते. आपल्या वैभवाच्या उगमस्थानावरून पेशव्यांची दृष्टि अगदीं ढळली होती. नवीन पेशवा गादीनशीन होण्याचे वेळी वस्त्रे आणण्यापुरता काय तो पेशव्यांचा व सातारकरांचा संबंध उरला होता. एरवीं मराठी राज्याचा सर्व कारभार जबाबदार रीतीनें पेशवे चालवीत. वास्तविक पाहतां पेशवे हे इतर सात प्रधानांप्रमाणे महाराजांचे एक सरदार, असें असतां त्यांनींच मराठी राज्य आपल्या ताब्यांत घेतलें. तेव्हां इतर प्रधान अर्थातच त्यांचा हेवा करूं लागले. त्याचा परिणामः असा झाला कीं, पेशव्यांचा अधिकार बरेच सरदार मानीनातसे झाले ब्र त्यांना दायांत ठेवण्याकरितां मोठमोठ्या जहागिरी तोडून देऊन नवीन : - सरदार त्यास उत्पन्न करावे लागले. यामुळे सत्ता फारच विभागली गेली. व त्या मानानें ' राज्याची' बळकटी कमी झाली. १७६३ सालीं म्हणजे माधवराव पेशव्यांचे अमेदानीचे प्रारंभी सातारच्या महाराजांस पदच्युत करणों हैं दुय्यम प्रतीच्या सरदारांच्या कारस्थानांपैकी एक कारस्थान होऊन पाहिले होतें. " आपल्यास खाता न्यास घेऊन जात. एका प्रहरात किल्ला व

के....