पान:इतिहास-विहार.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

१०९

तीच गोष्ट केवळ हुजऱ्याचे सांगण्यावरून राघोबा करीत असे, अशीहि त्याच्या स्वभावाची एक बाजू संग्रहांत दिसून येते. तात्पर्य, पुढें रघुनाथ- रावाच्या ज्या दुर्गुणामुळे पेशवाईच्या बुरुजांत इंग्रजांची मुळी शिरली; त्याचें प्रतिबिंब ऐ. ले. संग्रहांत प्रसिद्ध झालेल्या पत्रांत अनेक वेळां दिसून येतें.

 पेशवाईतील कलीचा अवतार जो सखारामबापू त्याचे वर्णन मात्र सर्वांनी एकसारखें केलेले आढळते. त्याच्याबद्दल कोणाचाच मतभेद दिसत नाही. ज्यानें उठावें त्यानें त्यास शिव्या द्याव्या असेंच त्याचें नशीब किंवा त्याची करणी होती. गोविंद हरीचं तर असें एक सुद्धां पत्र नसेल की ज्यामध्यें त्यानें त्या सकारनामक " सोद्यास -लाखोली वाहिली नसेल. त्या शिव्या येथें उतरायच्या म्हटलें तर जागा पुरवणार नाहीं. तो दुष्ट, नीच, कळलाव्या, घरबुडव्या, " परित्राणाय - दुष्टांना साधूनां निग्रहायच " हेच त्याचे अवतारकृत्य, वगैरे शिव्या देऊन झाल्या, परंतु त्या अभिश्रापानें त्याचे कांहीं वांकडे होईना, त्याची सद्दी सुरूच होती व त्याचे शत्रु जे पटवर्धन त्यांस मात्र खडे खात दशदिशा भटकावें लागले. अशा रीतीनें भंडावून जाऊन हात टेकल्यावर गोविंद हरीनें शिव्या 'देण्याचे सोडलें व " त्याचे संग्रहीं द्रव्य आहे, कर्तेपण आहे, सारा राजमंडळाचा कार्यभाग स्वाधीन आहे. सर्व आपलेच करील. त्याची तपश्चर्या भारी. याप्रमाणें कोणाचेहि संकल्प सिद्धीस जाणार नाहींत. आमचा कैवारी श्रीपंढरीनाथ समर्थ आहे. आम्ही त्या पाजीची काळजी मुळींच वागवीत नाहीं." वगैरे निराशेचे उद्गार काढण्यापलीकडे त्यांचे हातीं कांहीं उरलें नाहीं. पटवर्धनांचें मत एकपक्षीय होते. ते विकारवश झालेले होते हैं खरें, तथापि एकंदरीनें स्वतः सखारामबापूची कृति निद्यच होती यांत फारशी शंका नाहीं. तो शहाणा ब कर्ता होता. तथापि त्याचे सारे कारस्थान आपल्या पोळीवर तूप ओढण्याचे. त्याच्याचमुळे कोंकणस्य व देशस्थ यांच्यांतील तंटे झाले, या संबंधांत कोंकणस्थदेशस्थांचा झालेला करारनामा नंबर ६१ चे पत्रांत आहे तो पाहण्यासारखा आहे. रघुनाथरावास हाती धरूनच त्यानं त्याजकडून पेशवाईच्या नाशाचें बीज रोवविले.." विठ्ठल सुंदराची शात्रीति करीन, परंतु आपल्या मनचे हेतु सिद्धीस नेईन" असे तो म्हणे. असा त्याज संबंधाने मोविंद हरीनें उल्लेख केलेला ऐ. ले. संग्रहाचे १४ अंकांत आढळतो.