पान:इतिहास-विहार.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
केळकरांचे लेख

असे असूनहि पटवर्धनांनी खुद्द माधवरावास कधींहि नांवें ठेविलीं नाहींत, ही गोष्ट ध्यानांत धरण्यासारखी आहे. माधवरावाच्या शूरत्वासंबंधाने पाहतां मिरजेच्या वेढयाचें काम चालू असतां आंतील लोक मोर्चे टिकूँ देतना, रात्रीचे बाहेर पडून हल्ले करीत, तेव्हां माधवराव स्वतः मोच्यत जाऊन बसत असत, असा गोविंद हरीचे पत्रांत उल्लेख आहे. तसेच - राक्षसभुवनची लढाई ही माधवरावाने पाहिलेली अशी पहिलीच लढाई असतां त्यांनी त्या लढाईत " आम्हांपेक्षां अधिक झाले " ( पत्र ३४७ ) असा धन्यवाद खुद्द रघुनाथरावाचे तोंडून म्हणवून घेतला असो.

 रघुनाथरावासंबंधानें पाहतां त्याच्या स्वभावाचें वर्णन ठिकठिकाण आलेलें आहे. त्र्यंबकरावाचे मतें रघुनाथराव म्हणजे "निर्विकारी ( मूर्ख) भरंवसा शब्दाचा नाहीं." ( १० २१६ ) " समुद्रवलयांकित पृथ्वीचे वडीलपण अनायासाने मिळाले " तें गाजविणारा, व सखारामबापूच्या शब्दानें 'चालणारा.' स्वतःचे मतें रघुनाथराव हा मनास येईल ते बोलणारा- मोळा " असा होता. माधवरावाचे मर्ते त्याला फक्त दुःसंगाची बाधा होती. एरवी "तीर्थरूप ( रघुनाथराव ) स्वच्छ अंतःकरणाचे स्फटिकवत्. संगदोषेकरून मात्र बुद्धिचांचल्य होतें. " गोपिकाबाईशीं रघुनाथरावाचें - वर्तन किंचित् कुर्य्याचें असे. मराठे सरदारांस मोंगलाकडे पळून जाण्याचें वळण रघुनाथरावानें जरी प्रथमच घालून दिलें होतें असें नाहीं, तरी पण - त्यानें तें त्यांचे नजरेस चांगलेच आणले. रघुनाथरावासंबंधानें त्याचे काळ कोणाच्याच मनांत पूज्यभाव नव्हता. चुलतेपुतण्यांत कलह लागला तेव्हां रघुनाथरावानें गोपिकाबाई वगैरेंस चौकीपहाऱ्यांत ठेविलें. हें पाहून केवळ भिक्षुकीचें अन्न खाऊन स्वस्थ पडलेल्या सात्त्विक ब्राह्मणांसहि रागाचा उमाळा आला व " एकाचें नांव ल्याहावें तरी तो राजद्रोही होतो " या भीतीने सर्व ब्रह्मवृंदांनी मिळून त्यास पत्र लिहिलें आहे, तें मात्र चमत्कार - वाटण्यासारखे आहे ( पत्र १०२ ). रघुनाथरावाचे हातून घडलेल्या सर्व प्रमादांचा पाढा वाचून नंतर "तुम्ही महाराज भोळे. राजाई (राज्य करण्याची अक्कल ) तुम्हांस कांहीं कळेना. तुम्हांस कांहींच नकळे, तीन 'पिढ्या दौलत मिळविली ती तुम्हीं क्षयास नेली " वगैरे शब्दांनीं त्यास · यथेच्छ बाक्ताडन केलें आहे. जी गोष्ट मोठमोठ्या सरदारांचीहि ऐकूं नये