पान:इतिहास-विहार.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
केळकरांचे लेख

वांचून रहात नाहीं. पुण्याच्या रक्षणार्थ पेशव्यांनीं मागे ठेवलेले नारों अप्पाजी तुळशीबागवाले यांचे गोपाळरावास " तुम्हांस शब्द लावावा! तरी तुम्ही सर्व प्रकारें तेथून साहित्य करितां" असें सर्टिफिकिट आहे. गोपाळरावानें " आपल्यातर्फे कांहीं कमी केलें नाहीं." तो म्हणतो.." या प्रसंग अग्रेसर असतों तर बहुतांचा नाश होऊन राज्य 'ल्यासच जाते. आमचें कर्जहि फिटतें. परंतु पदरी लहान माणसाई येते, 'पुढेमागे सर्वांचा द्वेष पडतो." म्हणून पुण्याचा बचाव आपण होतां होईतों केला. " चित्तांत पैका न घेतां रक्षणं करावें असें मानस होतें परंतु (हैद्राबाद ) शहरापासून श्रीमंतांनीं रुपये घेतले व नाश केला व बेदर जाळलें यास्तव कांहीं तरी खंडणी द्यावी हें मानस यांचे ( मोंगलांचें ). व द्रव्यदृष्टि फार " म्हणून गोपाळरावाचें कांहीं चाललें नाहीं. तात्पर्य, पुणे जाळल्याचे बाबतींत गोपाळराव पटवर्धनावर बिलकुल दोष रहात नाहीं.

 एकंदर पटवर्धन घराण्याचा विस्तार, त्यामध्यें गंजांतील भांड्याप्रमाणें एकाखाली एक असे एकसारखे शूर लहान मोठे सरदार, त्यांचें दरबारी असलेले वजन, प्रसंगविशेषीं त्यांजवर पेशव्यांची गैरमर्जी होऊन सर्व जहागीर खालसा होऊन महत्संकट आलें असतां सर्व पटवर्धन सरदारांची असलेली एक जूट वगैरे गोष्टी या ग्रंथांत चांगल्या दिसून येतात.. . रा० खरे यांनी ११० पानांत एक मोठी टीप दिली आहे. त्यामध्यें · असें लिहिलें आहे कीं, "त्या वेळीं पटवर्धनांचे घराणें तेजस्वी होतें. ‘प्रत्येक स्वारींत सोळासतरा पुरुष घरचे असत. पण कधी कोणांत कुरकुर 'देखील होत नसे, मग तक्रारी, फितूर व भांडणे यांचें नांव कशाला ? वडिलांविषयीं मर्यादा, आपसांत एकजूट आणि पुढाऱ्यावर पूर्ण विश्वास, या तीन गोष्टींचे बाळकडूच सर्वोस मिळाले होते. सर्वांची प्रीति व द्वेष, ग्रह व आग्रह, मसलतीच धोरणें, व वागणुकीच्या तन्दा एकच. अशा संघ- शक्तीच्या जबरदस्त जोरावर कसेंहि संकट पडलें तरी ते डगमगत नसतः व पाहिजे ती मसलत पार पाडण्याचे सामर्थ्य त्यांमध्यें होतें यांत नवल काय? "एक मेल की त्याच्याच तालमेंत तयार झालेला दुसरा त्याचे काम बजावण्यास तयार आहेत " व या विधानास आजपर्यंत प्रसिद्ध आलेल्या पत्रांत बराच पुरावा मिळतो.