पान:इतिहास-विहार.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

१०५

करण्याविषयीं निरवणूक असावी अशी ही गोविंद हरीमार्फत गोपाळरावास त्यानें विनंति केली होती. पुण्याचे खासगीवाले व तुळशीबागवाले यांनींहि गोपाळरावास " जेणेंकरून गांव बांचे तुम्हांस तें करणें " असें लिहिलें होतें. गोपाळरावानेही पुणे वाचविण्यास आपल्याकडून काही कमी केलें नाहीं. पेशव्यांनी मोगलाईत केलेल्या धूळधाणीचा सूड घेण्यापेक्षां दुसरा हेतु पुण्याकडे पुंडाई करण्यांत मोगलांचा नव्हता. यामुळे ते गोपाळरावांचे ऐकतील असें नव्हतें. इकडे आल्यानंतरहि मोंगलांनी सर्व शहर एकजात लुटलें नाहीं.. तर त्यांचे फौजेंत असलेल्या मराठ्या सरदारांनींच गांवांतील धनिक लोकांची माहिती देऊन त्यांस लुटविलें... इतकें असूनहि गोपाळ- रावानें पुणे वांचविण्याची आपल्याकडून शिकस्त केली. मोंगल अवचित येऊन पुणे लुटतील व त्यामध्यें गोपिकाबाई व छोटे नारायणराव पेशवे कैद केले जातील यास्तव गोपाळरावानें गोपिकाबाईस आगाऊ पत्र. पाठवून सूचना दिली होती व त्याप्रमाणे गोपिकाबाई सिंहगडावर निघूनहि गेली. गोपिकाबाईनें सूचना घेतली, परंतु तिनें हे सर्व खेळ गोपाळरावाचे असें समजून त्यास मर्मभेदक पत्र लिहिलें, त्यास गोपाळरावाने पाठविलेले उत्तर नंबर २४९ चे पत्रांत आहे. तें वाचण्यासारखें आहे. आमचे चित्तीं आपल्या राज्याचें अकल्याण असतें तरी मागेंच इकडून जातेसमयीं आम्हांस पुण्यास ( स्वारी करण्यास ) जा म्हणत होते, परंतु आम्हीं ती गोष्ट कबूल न केली त्यापासून आम्हांस ( मोंगल ) म्हणतात कीं यांस ' त्यांची (पेशव्यांची ) माया सुटत नाहीं.' म्हणून. एखादी दंग्याची गोष्ट केली तरी आम्हांस कळू देणार नाहींत. म्हणून आम्हीं सूचना करविली तें विपरीत मानून सारें अपेश आपण आम्हांवरीच ठेविलें. कालमहिमाच आपण आमचे भरवशावर बेफिकीर राहतील. आम्हांवर अपेश येईल म्हणून आम्हीं सूचना करविली ते सारीच मांड आम्हावर आली. उत्तम आहे, आपण आमचें इमान प्रमाण घेतलें किं दुसरें. चित्तांत आणूं नये, त्यावरून आम्ही सर्वस्वास बुडोन राज्यभ्रष्ट झालों. एकूण आपलेकडील माया सुटेना यामुळे 'अतोभ्रष्ट' आपलं चित्तांत 'जें करतों तें आम्हीच' यामुळे 'ततोभ्रष्ट' याउपरी आम्ही दुसरें पत्र सूचनेचें लिहीत नाहीं. " हें पत्र वाचून गोपाळरावाचे स्थितीबद्दल वाईट वाटल्या-