पान:इतिहास-विहार.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
केळकरांचे लेख

बिसरून जाई. गोविंद हरीनें त्यास एक वेळ खालीलप्रमाणे उपदेश केला आहे. “तुम्ही घोडेखाली उड़ी टाकता है काम घरबुडवें. आर्धी शंभर- जण उडी टाकतील, मग तुम्ही उडी टाकणं.” गोपाळरावाचा स्वभाव मोठा दुराग्रही असे. नानासाहेब पेशव्यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे कितीहि जीव तोडून लिहिलें तथापि सखारामबापूर्वी मिळून राजकारण करणें ही गोष्ट त्याचे हातून घडून आली नाही. तसेंच माधवराव पेशव्यांनी कितीहि निक्षून सांगितले, तरी रघुनाथरावाशीं त्यानें आमरणांत सख्य केलें नाहीं. निजामअल्लीस जाऊन मिळण्याचे काम गोपाळरावाचे हातून जी मोठी 'चूक झाली तिचे गोविंद हरीने ठिकठिकाणी 'समर्थन' केलें आहे.तथापि एकंदरीनें पहातां त्याचें तें कृत्य दुराग्रहामुळे व त्या काळी मराठे लोकांचे अंगी दिसून येणाऱ्या एक प्रकारच्या विलक्षण अदूरदर्शित्वामुळे झालें असें म्हणण्यास आम्हांस हरकत वाटत नाहीं.

 आतां निजामअलीस जाऊन मिळाल्यानंतर पुढें पुण्याची दुर्दशा झाली याबद्दलचा दोष मात्र गोपाळरावास किमपिहि देतां येईल असे आम्हांस वाटत नाहीं. या दुर्दशेचें मुख्य कारण म्हटलें तर मराठ्यांची शत्रूचे मुलखांत जाऊन आपणच मुलूख लुटण्यास प्रारंभ करण्याची खोड होय. याविषयीं गोविंद हरीनें एके ठिकाणी मोठ्या मार्मिकतेनें लिहिलें आहे. ( नं० २८२ चे पत्रांत ) "श्रीमंतांच्या दौलतीचा विनाशकाल आला त्यास तुम्हीं चिंता करून काय होणे, ज्याची त्यांनीं आस्था सोडून गोरगरीबें लुटीत, देश जाळीत, भागानगर प्रांत फिरतात. हे मोंगल त्यांचा देश जाळतात. दे वाण घे वाण आहे. " गोपाळराव निजामअल्लीचे आश्रयास जाऊन राहिला होता हैं खरें, तथापि त्यांचें सर्व चित्त पुणे शहर व आपले लोक यांजकडे होते. त्रिंबकराव मामा पेठे यांनी गोशाळराव मोंगलाकडे असतां, त्यास एकदोन पत्रे पाठिवली आहेत. त्यांत " प्रस्तुत आम्ही पेंचांत दोन महिने आहों. पुढे सर्व प्रकरण लौकिकरक्षणाविषयीं चिरंजीवाची सोई करणें " म्हणजे मोंगलाकडे आपल्या मुलास असामी लावून द्या, अशी त्यानें गोपाळरावास विनंति करविली होती. तसेंच पुढें नाशीक प्रांती मोंगलाची फौज उच्छा- दास गेली असतां " त्या स्थलांचे संरक्षण वस्तबांनी सुद्धां होय ऐसें अगत्य करावें " असें विठ्ठल सुंदर यास सांगून, जो जाईल त्यास अगत्य रक्षण