पान:इतिहास-विहार.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाच परीक्षण

१०३

मतानें तो शांतिपाठ, जपजाप्य, ग्रहृदाने वगैरे करी, परंतु नेहमीं भरंवसा " श्रीपंढरीनाथावर " हें धर्माचें बारे गोविंद हरीस चांगले उपयोगी पडत * असे, मिरज हातची गेली, उभें राहावयास स्थल देखील मिळेना, महिना दहाबारा हजार खर्च खाणारा परिवार बरोबर घेऊन कुटुंबाची माणसें एकीकडे व आपण एकीकडे असें भटकत असतांहि गोविंद हरि ईश्वरावर भार टाकून सुखी असे, तात्पर्य, गोविंद हरीसारख्या वरिष्ठ प्रकारच्या सरदाराची हकीकत अँटडफ किंवा इतर कोणच्याहि ग्रंथांत न मिळणारी अशी ऐ. ले. संग्रहांत पुष्कळ मिळते.

 गोपाळराव हरीबद्दलहि आजपर्यंतच्या ऐतिहासिक ग्रंथांत फार थोडी माहिती मिळते. गोपाळरावांस नानासाहेब पेशव्यांनी लिहिलेली एक दोन पत्रे संग्रहाच्या दुसन्या लेखांत छापलेलीं आहेत. दौलताबादेस गोपाळरावानें वेढा घातला असा किल्ला लवकर हस्तगत होईना, तेव्हां नानासाहेबांनी गोपाळरावांस प्रथम कठोरपणानें लिहून नंतर धाकट्या भावंडास लिहितात तसे सलगीनें व प्रेमाने खालीलप्रमाणे लिहिलें आहे. "या उप्पर या पत्रा- १ चरून जितका राग येईल तितका त्याजवर (किल्ल्यावर) काढणे. जर कार्य झाले असेल तर मग व्यर्थ राग येऊ न देणें, हें पत्र कोणास ठाऊक नाही. लेकरादाखल सेवकावर एकांती रागे भरल्यास वाईट मानू नये. " तसेंच पुढे एक वेळ गोपाळराव रुसून घरी बसले असतां "तुम्ही म्हणाल की, खावंदांनी आमची आड कां न चालवावी ? त्यास चिरंजीव दादांनी भाऊंची अमर्यादा केली, तरी आम्हीं शिक्षा केलीच पाहिजे. कां कीं पुढें बहुत दिवस मर्यादा कैद चालली पाहिजे. तसेंच तुम्हांवर मनापासून कृपा वर्धमान होऊन तुम्हांजवळून मोठी कामे घेतलीच पाहिजेत" इत्यादि लिहिलें आहे. नाना- 'साहेब पेशव्यांचे मरणानंतर गोपाळराव माधवराव पेशव्याचे बाजूस राहिला 2. ब. रघुनाथराव पेशवे यांच्यावर जी स्वारी झाली त्यांत सरदार असा गोपाळरावच प्रमुख होता. पुढे चुलते-पुतणे एक झाले तरी त्यानें रघु- नाथरावाचा दावा सोडला नाहीं व यामुळे पटवर्धनावर इतराजी होऊन त्याच्या मिरज वगैरे सर्व जहागिरी जप्त झाल्या व गोपाळ- रावास निजामअल्लीचे आश्रयास जावें लागलें. गोपाळराव हा स्वभावानें तल्लख, तापट व शुरु होता. लढाईच्या प्रसंगी तो अगदीं देहभान