पान:इतिहास-विहार.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
केळकरांचे लेख

धमकेवर मिरजेचा किल्ला पेशव्यांशी सव्वा महिना झुंजविला. गोपाळराव मोगलाकडे निघून गेला व मोगलानें पुणे जाळलें तेव्हां पेशवे व इतर लोक त्यास अर्थातच नांवें ठेवूं लागले. लोकापवादाची वार्ता ऐकून गोपाळरावास फार वाईट वाटे व तो तसे आपले बापास लिही. त्या प्रसंगी गोविंद हरि हा. आपल्या मुलाच्या समाधानार्थ जो बुद्धिवाद लिहीत असे त्यावरून त्याची तर्क लढविण्याची खुबी चांगली व्यक्त होते. " आपण एकनिष्ठेनें सेवा केली, फलदाता ईश्वर आहे." "आपण श्रम मानावयास कारण काय ? यजमानांनी राज्यांतून बाहेर घालविलें, उभें रहावयास स्थळ नाहीं, फौजेवर छापा घालून सत्यानाश केला, निदान झाले तेव्हां जीव वांचवावे याअर्थं नबाबाकडे गेला. पुढें प्राक्तनीं असेल तसें घडेल, चिंता कोठवर करणार." वगैरे लिहून तो गोपाळरावाचें सांत्वन करी. मिरजेच्या किल्ल्यांत बंदोबस्तानें सहून खुद्द पेशव्यांशीं गोविंद हरीनें लढाई केली या अपवादापासून आपला बचाव करण्याकरितां गोविंद हरीने गोपाळरावास लिहिलेला मजकूर वाचण्यासारखा आहे. रघुनाथराव भांडून निघून गेला असतां गोपाळराव माधवराव पेशव्याचे बाजूस होता. त्या वेळीं शत्रुपक्षाकडच्या व फितूर असलेल्या स्ररदाराचे घरीं चोरपाळतीनें बातम्या कशा ठेवाव्या, रघुनाधरावास कसें धरावें च एकदोघां तत्पक्षीयांस युक्तीनें साधून जरर्खेत आणले म्हणजे दाब कसा बसेल वगैरे त्याचा उपदेश, त्याचप्रमाणे गोपाळराव मोगलाकडे गेला असतां त्यानें परत यावे यासाठी पेशव्यांच्या मार्फतीने गेलेल्या पत्रांस त्याने सुचविलेली उत्तरे वगैरे गोष्टींवरून गोविंद हरीचें दीर्घ धोरण चांगलेच कळून येतें.

 गोपाळरावावर गोविंद हरीचें अत्यंत प्रेम व त्याचप्रमाणें जरब्रहि पण अत्यंत होती असें मानण्यास वराच पुरावा आढळतो. गोपाळरावाचे पहिले कुटुंब निवर्तल्यावर त्याजकरितां कोंकणांतून दोनतीन मुली गोविंद हरीनें आण-- विल्या. वधू येऊन खोळंबून बसल्या, परंतु गोपाळराव येईना.तेव्हां गोविंद हरीनें आपल्या मुलांस चरचरीत पत्रे लिहिलेली आहेत. "वधू आणवून मूर्खर्पण. परिच्छिन्न लझ केलें पाहिजे. शंभर बुद्धि कार्याच्या नाहीत."

 " फिरून ऐसें लिहिण्याचे प्रयोजन नाहीं." "तुम्ही दहा में करा. आधीं हें मग दुसरें " इत्यादि कठोर शब्दांनीं त्यानें आपल्या मुलाचा केलेला निषेध वाचण्यासारखा आहे. " शास्त्रविरोध करूं नये. " या