पान:इतिहास-विहार.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

१०१

पासून तो इकडे औरंगाबाद, भागानगर, नागपूर व इकडे उत्तरेंतील शिंदे होळकरांच्या छावण्या, इतक्या टापूंतील खबरा प्रत्यहीं त्यास मिळत व तो इतरांस देई. लढाया किंवा वेढे अशा प्रसंगांसुद्धां हैं पत्रव्यवहाराचे काम अबाधित चाले, त्या काळच्या प्रवासाच्या गैरसोयी व वाटेचें भय इतक्यां- तूनहि " जोडीच्या " जासुदांची डाक कशी सर्रास सुरू असे व ती आपले काम किती जलद व वक्तशीरपणाने बजावी ही मोठी कौतुक करण्या- सारखी गोष्ट आहे. हल्लीं जुन्या पिढीचे लोकांत टपालाची संस्था सुरू होऊनहि, पत्रे पाठविण्याचा फार कंटाळा दृष्टोत्पत्तीस येतो. यावरून पेश- वाईतील लोकांसंबंधानेंहि तसेंच अनुमान जर कोणी काढू लागेल तर या गोविंद हरीच्या पत्रांवरून त्यास साफ खोटें ठरवितां येईल, गोविंदरावा- प्रमाणे इतर सरदारांची डाक सुद्धां बरीच असावी हे उघड आहे. एकट्या गोविंदरावाचींच इतकी पत्रे रा० खरे यांस मिळाली त्याचें कारण कांहींहि असो; परंतु अशींच इतरांची पत्राहि इतर कोणास जर उपलब्ध होतील तर इतिहास द्रव्याचें केवढे भांडार हाती लागणार आहे ?

 गोविंद हरीची पत्रे व्यक्तीसंबंधानें कदाचित् एकदेशीय असतील, परंतु त्यांत प्रतिबिंबित होणाऱ्या देशकालवर्तमानाचे खरेपणाबद्दल शंका येण्याचे कारण नाहीं. ऐ. ले. संग्रहांतील पत्रांवरून नानासाहेब, थोरले माधवराव, या पेशव्यांचे कारकीर्दीत पटवर्धन सरदारांचें महत्त्व व वर्चस्व किती होते तें स्च्छ दिसून येतें. परंतु मधून मधून त्या काळचे बहुतेक प्रमुख मुत्सद्दी व सर्व राजकारस्थाने यांजवरहि बराच उजेड पडतो. गोविंद हरि हे थोरले बाजीरावांशीं समवयस्क असून, बाजीचिमाजीचे जोडीबरोबर खांद्याला खांदा लावून त्यानें कामें केलेली होती. नानासाहेब पेशव्यांचे मरणानंतर गोविंद: राव हा वृद्ध व गोपाळराव हा कर्ता सरदार असे मानले जात असत. गोपाळराव पटवर्धनांचें महत्त्व शिंदे व होळकर यांचे बरोबरीचें असून, शिवाय पेशव्यांचा व त्यांचा विशेष जिव्हाळा होता. गोपाळरावानें पुण्यास व स्वारीत प्रमुखत्वानें पेशव्यांचे सन्निध असावें व गोविंद हरीनें जहागीर चालवून मुलास आपल्या अनुभवाचें शहाणपण शिकवावें, गोविंद हरि हा शूर, शहाणा, हिकमती, दूरदर्शी, करारी, खरा धार्मिक, नेहमीं सदाशा- प्रेरित, पण वेदांती असा दिसतो. साठीच्या उमरीस त्यानें आपल्या