पान:इतिहास-विहार.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
केळकरांचे लेख

तें तर गेलेच आहे, तरी पण जें कांहीं अजून काळाच्या व दुष्टांच्या तडाक्यांतून वांचलें असेल तें तरी आपलेसे करून घेणें आपले कर्तव्य नाहीं काय ? व तें जर आज आपण बजाविलें नाहीं तर त्याबद्दल उद्यां आपणांस कोणास दोष देतां येईल काय ? करितां,, हरकोणी, ज्याला इतिहासाची सामुग्री मिळवितां येण्यासारखी असेल त्यानें, यापुढे कंबर बांधून त्या महत्कार्यांस लागले पाहिजे. वरच्या तीन पिढ्यांचें ऋण जसे आपण श्राद्धकर्मानें फेडतों, तसेच आपल्या समाजाच्या अनंत पिढ्यांच्या पूर्वजांचें: ऋण, : त्यांच्या इतिहासाच्या उद्धारानेच फेडिलें पाहिजे व धर्मांच्या बाबतीत जसें बाडवडिलांची देवस्थाने चालवून त्यांची अवदात कर्मे आपण प्रकाशित करितों त्याचप्रमाणें त्यांचे शहाणपण व त्यांची नीतिमत्ता यांचें ज्यांमध्यें प्रतिबिंब दिसतें अशीं त्यांची व त्यांजविषयीं लिहिलेली मध्ये कशन बगापुढे मांडून त्यांची कीर्ति अक्षय करून ठेवणे,हेंच आपले कर्त्तव्य आहे.

 असा. प्र. ले, संग्रहाचं द्वारा आतांपर्यंत सुमारे ३२५ पत्रे प्रसिद्ध झाली आहेत अमिका शुकादम्पति पन्नासांवर पत्रे सरदार गोविंद हरि पटवर्धन यांनीं आपला मुलगा सार गोपाळराव गोविंद यास लिहिलेलीं आहेत. बाकीचीं थोरले मावेबरावसाहेब पेशवे, श्रीमंत रघुनाथराव पेशवे, गोपिका- बाई (माधवरावांची आई), सखाराम बापू, गोपाळराव हरि, कारभारी- वर्ग, कारकून लोक वगैरेंनी लिहिलेली आहेत. गोविंद हरीची बहुधा रोज- ची डाक दिसते. त्यास स्वतःस पत्र लिहिण्याचा कंटाळा नव्हता. गोपाळ- रावाकडून त्यास दर दोनतीन दिवसां पत्रे जात असावीसें वाटतें. इतकेंहि असून त्याची गोपाळरावाचे आळसाबद्दल कुरकुर व प्रेमळ शब्दांनीं कान उघाडणी चाललेलीच आहे. गोविंदरावाचे पत्रांतील विषयांची विविधता, व त्यांचे माहितीचा ताजेपणा पाहतां, गोपाळरावाप्रमाणे इतर पुष्कळां- बरोबर त्याचा असाच पत्रव्यवहार सुरू झाला असला पाहिजे. खाली कर्नाटका-