पान:इतिहास-विहार.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

९९

ती खुर्ची खरोखरच शेक्सपीअरची असण्याचा संभव असेल, या नुसत्या आशेवर झुलणारे हजारों लोक पैसे देऊन ती पहावयास कसे जातात; इत्यादि गोष्टी ध्यानांत आणिल्या असतां, इंग्रज लोकांचे अंगीं पूर्वजांचा खरा अभिमान आहे म्हणून त्यांचा इतिहासच काय, परंतु त्यांचे स्वराज्य 'देखील आज उत्कृष्ट दशैंस आले आहे व आपणांमध्ये त्याचाच अभाव असल्यामुळे आमचें स्वराज्य तर गेलेच, परंतु नुसता इतिहास, नुसती कोरडी आठवणहि शिल्लक राहिली नाहीं हें उघड दिसून येतें. विलायतेंत इतिहासोद्धाराचे कामास राजाश्रय आहे तसा इकडे नाहीं व यामुळें आमच्या इतिहासाचा उद्धार होत नाहीं हें म्हणणें व्यर्थ आहे. कारण विलायतेंत ज्या ज्या म्हणून गोष्टी राजकर्तृक आहेत अशा भासतात त्या सर्व वास्तविक लोककर्तृकच असतात.

 दुसरे पक्ष पहातां जित लोकांना त्यांच्या पूर्वजांविषयींचा अभिमान बाळगण्यासहि शिकवावयाचे इतका पत्कर कधीं कोणच्याहि जेत्यांनी आजपर्यंत घेतलेला नाहीं व त्यांना तो घेतांहि यावयाचा नाहीं; असें असूनहि आमचें सरकार जरी परकें आहे तरी समंजस व सुधारलेलें आहे, यामुळे आमच्या इतिहासाचे उद्धारास त्यांनी आजपर्यंत वरीच मदत केली आहे' व पुढेंहि ते करतील अशी आम्हांस आशा आहे. जुना इतिहास शिक- विण्याचे रीतीसंबंधानें आमचे राज्यकत्यांनी केवळ गैरसमजामुळे जरी पुष्कळ आक्षेप घेण्याचें आरंभिले आहे, तथापि खुद्द इतिहासाचे संबंधानें . त्यांचे मनांत केव्हांहि फारसा अनादर नाहीं. अलेक्झांड्रिया येथील प्रचंड ग्रंथसंग्रहाला आग लावितांना रानटी सुलतानानें जेतृभावाचे जोरावर जो युक्तिवाद लढविला तो ज्यास माहीत असेल त्याच्याने इंग्रज सरकार- कडून झालेल्या मराठी इतिहासाच्या उद्धाराचें गौरव व कौतुकच केल्या- शिवाय राहवणार नाहीं. आमचेंच राज्य असतें, तर आमचा आम्हीं इतिहास उत्कृष्ट तयार केला असता, व जुने कागदपत्र राखून ठेवण्यास भक्कम व सुंदर गोपुरेंहि बांघविलीं असत, तें सर्व कांहीं कदाचित् यथा- स्थित झालें असतें. परंतु आज स्वराज्य नाहीं तरी आमचें आम्हींच पुष्कळ कावयाचें आहे, हे कबूल केल्याशिवाय चालावयाचें नाहीं. तात्पर्य काय की, जे आपल्याआपण नष्ट झाले किंवा जें कांहीं कोणी दुष्टाव्याने नष्ट कैले