पान:इतिहास-विहार.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
केळकरांचे लेख

बयाचीच. यामुळे तेथे इतिहाससामुग्रीचें मुख्य भांडार जमलेलें असलेच 'पाहिजे, व यास्तव उद्योग करणारास खुद्द महाराष्ट्रांत अजूनहि पुष्कळ महत्त्वाचे कागदपत्र उपलब्ध होण्याचा संभव आहे. आतां महाराष्ट्रांत किंवा इतरत्र, हे कागदपत्र ज्यांच्या ताब्यांत आहेत असे पुष्कळ लोक कंगाल असतील, परंतु कित्येक लोक श्रीमानूं जहागीरदार व सरंजामी नामदार असेहि असतील. याकरितां तारतम्यानें ज्यास ज्याची उणीव तें देऊन कसेंहि करून त्यांचे ताब्यांतील कागदपत्र प्रसिद्ध व्हावे असा उद्योग सर्वांनी आपापल्या परीनें आरंभिला पाहिजे, उद्योग करणास भेटल्यास जुने हस्तलेख वगैरे मौल्यवान् चिजा, अज्ञान, अभिमान, धर्म- भोळेपणा, किंवा भीति, यांपैकी कोणचेहि कारणामुळे मागे पडून राहिलेल्या असल्या तरी, पुढें येऊ शकतात ही गोष्ट आनंदाश्रमासारख्या संस्थेने चांगलीच सिद्ध करून दाखविलेली आहे. वरील प्रकारचा उद्योग सफल होण्यास बराच पैसा लागेल हें खरें आहे, तरी पण असले उद्यो पैशापेक्षांहि उत्साहावर फार अवलंबून असतात.

 हा उत्साह किंवा जुन्या इतिहासाविषयींचें खरें प्रेम जर आमचे लोकांचे आंग असतें तर आजपर्यंत शेंकडों खंडी कागद बेअकली लोकांनी विकले ते विकले नसते, जाळले नसते किंवा कसरीच्या भक्ष्यस्थानी पडूं दिले नसते. व हाच उत्साह किंवा हीच प्रीति अद्यापि जरी उत्पन्न होईल तरी अशाच रीतीनें पुढे होणारा संहार तरी वांचेल, यांत कांहीं संशय नाहीं. इंग्लंड देशामध्ये मॅग्नाचासारखे लेख, जवाहिराप्रमाणें मौल्यवान् कोंदणामध्ये कंसे घालून ठेविलेले आहेत व यःकश्चित् कागदपत्रसुद्धां फुकट जाऊं नये म्हणून मोठमोठ्या म्युझियम्स् बांधून त्यांमधून आग, हवा, पाणी, यांच्या आटोक्याबाहेर त्यांस कसें सुरक्षित ठेविलेले आहे; तसेच, जुन्या काळच्या किंवा लोकप्रिय मुत्सद्दधाच्या किंवा कवीच्या हातची बोटभर चिठ्ठी मिळाली तरी ती मिळविणारास विलायतेंत किती धन्यता वाटते; किंवा तो लोभी असून त्यानें ती विकावयास काढिली असतां तिची त्याला किती प्रचंड किंमत येते; फार काय, पण शेक्सपीयर ज्या खुर्चीवर बसून आपली नाटकें लिहीत असे, ती व तिच्या जागी मांडलेल्या कित्येक कृत्रिम खुर्च्या मोडून गेल्या असतील, हैं बहुधा माहीत असतां, कदाचित आपण पाहूं