पान:इतिहास-विहार.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

९७

त्याच रणांगणावर लढाऊ हत्तींचे गळ्यांतून तुटून पडलेल्या एका घंटेखाली. चिमणीचीं पोरें बचलीं जाऊन आनंदाने नांदत होतीं ही सुप्रसिद्ध दंतकथा ज्यांना आठवत असेल त्यांना, आज शंभर वर्षेपर्यंत आमच्या इतिहासाच्या सामुग्रीचा संहार चालला असतां अजूनहि सांधीकोपन्यांतून बिनमोल माहिती मिळण्याचा संभव आहे हें खरें वाटण्यास कांहीं हरकत नाहीं. अंतरंगांत पेटलेली देशाभिमानाची मशाल घेऊन जो कोणी हल्लींच्या या अज्ञान व अनास्थारूपी तमोमय रात्रीत संचार करण्यास अजूनहि प्रवृत्तं होईल त्याला 'पोकळ गांव'च्या इनामदाराचे पडक्या वाड्याचे वळचणीत, तात्यापंतोजीचे शाळेत पुस्त्या गिरविणाऱ्या पोरांचे दप्तरांत, अभिमानामुळें जतन केलेल्या परंतु अज्ञानामुळे सतरां गांठी मारून अठरा कुलुपांत ठेव- लेल्या कागदपत्रांचे ब्रह्मघोटाळ्यांत, किंवा तागडीतुकाप्पाचे रद्दीचे पुडक्यांत, ज्याच्या योगानें इतिहासचा इतिहास फिरेल अशी माहिती. अद्यापहि मिळेल; नाहीं कोणी म्हणावें ! मात्र हें सर्व होण्यास अभि- मानानें उजळलेली व कौतुकानें तीक्ष्ण केलेली अशी दृष्टि असणें जरूर आहे.

 सतराव्या व अठराव्या शतकांत आपल्या देशांत स्वराज्य होतें त्या वेळी मोठमोठे सरदार, कारकून, मुत्सद्दी व राज्यसंस्थापक असे पुरुष शेंकडों होऊन गेले, व रामेश्वरापासून अटकेपर्यंत जिकडे जिकडे भगवा झेंडा गेला तिकडे तिकडे वरील लोकांस अलौकिक बुद्धिचातुर्य व पराक्रम प्रगट करण्याचे प्रसंग आले. या मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे मराठी राज्याचा व्याप एका काळ फारच मोठा झालेला होता आणि जेथे जेथे आपले राज्य पूर्वी होतें त्या त्या ठिकाणी पूर्वीच्या शतकांतील इतिहास- प्रसिद्ध पुरुषांचे जे वंशज अद्यापिहि नांदत आहेत, त्यांजजवळ कांहीं नाहीं तरी बरेच कागदपत्र असले पाहिजेत. माळवा, मध्यप्रांत, बुंदेलखंड, कर्नाटक, तंजावर, मोगलाईमुलुख, गुजराथ या सर्व प्रांतांत सद कागद पत्रांविषयीं शोध केल्यास तो सफळ होण्याचा पुष्कळ संभव आहे. खुद्द महाराष्ट्र तर राज्यलक्ष्मीचें माहेरघरच होतें. दूर पर्वतांच्या माथ्यावर पडलेले पाणी जसें नदीमुखांनी अखेर समुद्रांत एके ठिकाणी होते, त्याप्रमाणें संपत्ति काय किंवा इतर कोणतीहि गोष्ट काय, मराठी राज्याच अगर्दी दूरच्याःकोन्याकोपऱ्यांत असलेली, तेव्हां महाराष्ट्रांत येऊन पडा-