च्या सनदेंचें. तो महाल इनाम दिल्याची सनद शाहूमहाराजांनीं अनूबाईस दिली होती. तींत एकतर्फी व दुतर्फी सर्व ९७ खेडीं कुलबाब व कुलकानू इनाम दिल्याचें लिहिलें होते. हक्कदार व इनामदार यांचा पैका मात्र महालाच्या उत्पन्नांतून वजा व्हावयाचा होता. सारांश, ही सनद शिरस्त्याप्रमाणें जशी यथयोग्य पाहिजे तशीच होती. तथापि तींत थोडी फट राहिली होती; ती अनूबाईंनीं संभाजी महाराजांपासून नवी सनद घेऊन भरून काढली. शाहूमहाराजांनी इचलकरंजीकरांस दुतर्फी खेड्यांचा अंमल व उत्पन्नाचा हिस्सा इनाम दिला तो करवीरकरांस मान्य होता. परंतु एकतर्फी खेडीं कापशीकरांस संभाजीमहाराजांकडून मोकासा चालत होतीं तींच शाहूमहाराजांनी इचलकरंजीकरांस इनाम दिलेलीं होतीं, यांबद्दल करवीरकरांस पुढे मागे तक्रार करण्यास जागा होती. अनूबाई हयात होत्या तोंपर्यंत शाहूमहाराजांची सनद पुरेशी होतीच. परंतु त्या वारल्यावर इचलकरंजीकरांस या ३० खेड्यांची नवी सनद करवीर छत्रपतींपासून घेणें प्राप्त होते. कारण, हें इनाम एका घराण्यांतून निघून दुसऱ्या घराण्यांत गेलें त्याअर्थी नूतन इनाम झालें. ज्यांनी कापशीकरांस मूळ सनद दिली त्यांनींच इचलकरंजीकरांस हे नूतन इनाम म्हणून दिल्याची नवी सनद दिली पाहिजे. ती इचलकरंजीकरांनीं न घेतली तर इनाम चालविण्याविषयीं हरकत घेण्यास करवीरकरांस जागा होती; व पुढें मागें ही नवी सनद देते वेळीं करवीरकरांनी त्यांतलीं कांहीं खेडीं मागितली असतीं, निदान नजर व दरबार खर्च म्हणून सडकून पैसा हबकला असता, यांत संशय नाहीं. हें पुढचें भय मनांत आणून व पेशवे छत्रपतींचा पूर्ण मिलाफ झाल्याची संधि पाहून अनुबाईंनीं करवीर
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/८५
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७५ )
नारायणराव व्यंकटेश.