होते. कसेंही असो, महाराज व त्यांच्या राण्या यांशीं नम्रतेनें, आज्ञाधारकपणानें व धन्याच्या पदास साजेल अशा आदरानें पेशवे या भेटींत वागल्यामुळें या सर्वांची यांवर सोळा आणे सुप्रसन्न मर्जी झाली ! सोंधे व बिदनूर या संस्थानांची खंडणी दरसाल संभाजीमहाराजांस मिळावयाची, पण ती वसूल करण्यास स्वारी करण्याची यातायात पडे ती त्यांस होईना; सबब ती खंडणी वसूल करण्याचा हक्क त्यांनीं प्रसन्नतेच्या भरात पेशव्यांस देऊन टाकिला !
या संधींत पेशव्यांच्या स्वारीबरोवर अनूबाई होत्या. त्यांनीं छत्रपतींकडून आपली कामें करून* घेतलीं. पहिलें काम आजरें महाला-
*सन १७२० च्या सुमारास तयार केलेल्या आजरें महालाच्या देहेझाडयाचा उल्लेख पूर्वी केला आहे. तो देहेझाडा व शंभूछत्रपतींनीं ता. १३ नोव्हेंबर १७५३ ( राजशक ८० कार्तिकबहुल तृतीया, भौमवासर, ) या दिवशी दिलेली ३१ खेड्यांची सनद यांची तुलना करून पाहिली असतां बऱ्याच गोष्टी कळतात. एकतर्फी खेडीं सेनापती निसबतचीं देहेझाड्यांत ३७ होती. त्यांतलीं धर्मादाय व इतर इनाम वजा जाता जाता स. १७३५ पर्यंत ३२ व स. १७५३ पर्यंत ३० राहिली होती.करवीर दरबारानें यांतले एक खेडें दुतर्फींत घालून व दुतर्फीपैकीं दोन खेडीं एकतर्फित घालून ही ३१ गांवांची सनद दिलेली आहे. खमस खमसैन मय्या व अल्लफच्या अवलीस ( १७५४ जून ) तयार झालेल्या देहझाड्यांत दुतर्फी गांव ४६ दिले आहेत. त्यांत १४ सामानगड, ८ भूधरगड, १३ मनोहरगड व ११ हुजूर खासगीकडे, असा तपशील आहे. या हुजूर खासगीच्या खेड्यांपैकीच पुढें काहीं खेडीं हिम्मतबहादरास दिली गेल्याचें व गड निसबतच्या खेड्यांत आणखी घालमेली झाल्याचें पुढच्या सालोसालच्या इजमाइल्या व देहेझाडे पाहिलें असतां कळून येतें. दुतर्फी खेड्यांच्या अमलास संभाजीमहाराज व जिजाबाई हयात होतीं तोंपर्यंत कधीं हरकत झालेली नाही. इतकेंच नव्हे तर ज्या काळांत करवीरकर व इचलकरंजीकर यांचीं वारंवार युद्धे होत होतीं त्या काळांतसुद्धां येसाजी शिंदे व रत्नाकरपंत व खुद्द शिवाजी महाराज यांनीं कधीं हरकत घेतलेली नाही; उलट सर्व करवीर राज्याबरोबर दुतर्फी खेड्यांच्या हिश्यावर कधी पट्टी बसली तर वसुलीबद्दलसुद्धां इचलकरंजीकरांस जबाबदार धरून त्यांपासून आगाऊ चोपून पैका घेतलेला आहे !