पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(६६)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

ग्रंथकाराला माहीत नाहीं! असो. याप्रमाणें त्यांची त्यावर भक्ति होती. धनीपणाची मर्यादा राखून नम्रपणानें वर्तन करणें व आज्ञा पालन करणें यांतही त्यांची इतर सरदारांवर कडी होती आणि महाराजांची कृपाही त्यांवर त्या मानानेंच विशेष होंती.
 सन १७४९ च्या दिसेंबर महिन्याच्या पंधराव्या तारखेस शाहू महाराज मृत्यु पावले. मरणापूर्वी ते बरेच महिने आजारी होते त्या अवधींत आपल्या राज्याचे पुढें काय करावें या चिंतेत ते निमग्न होते. तत्कालीन राज्यस्थिति व महाराजांची गृहस्थिति वर सविस्तर वर्णन केली आहे त्यावरून त्यांस तशी चिंता उपन्न होण्यास कारणें होती हें दिसून येईलच. रामराजांस आपल्या गादीवर स्थापण्याविषयी त्यांनीं निश्चय पूर्वी केलाच होता. आपण मेल्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणें सर्व व्यवस्था पुढें सुरळीतपणें चालवील व राज्य संभाळील असा कोणी सरदार सर्व राज्याचा शास्ता व नेता म्हणून नेमिला पाहिजे, तसें न करावे तर राज्यांतले बलाढ्य सरदार रामराजांस गुंडाळून ठेवून यादवी माजवितील व राज्याचा नाश करितील, हे त्यांस स्पष्ट दिसत होतें. हा नेतृत्वाचा अधिकार कोणास द्यावा या विवंचनेत ते पडले होते.संभाजीमहाराज व फत्तेसिंग भोसले यांस हें काम झेंपण्यासारखे नव्हतें. दाभाडे, गायकवाड, नागपूरकर भोसले यांपैकी कोणाच्या हवाली हें काम करावें तर त्या तिघांस महाराजांनी मरणापूर्वी वारंवार निकडीचीं पत्रें पाठविली असतांही कोणी साताऱ्यास आले नाहीत. शेवटीं निरुपाय होऊन त्यांनी नानासाहेब पेशव्यांच्या हातीं राज्याचा मुख्य अधिकार सोंपविला. राज्याची नांवाची मालकी मात्र आपल्या वंशजांकडे, अखत्यारी आपापल्या मुलखापुरती ज्या त्या सरदाराकडे, आणि सर्व राज्याची / ‘वडीलकी’ मात्र पेशव्यांकडे, अशी ही महाराजांची योजना होती. पेशव्यांनीं सर्व राज्य संभाळावें व तें संभाळण्याच्या कामीं