व घेवविणारा या दोहोंतून एक मेला कीं दुसरा वाटेल तें करण्यास
मोकळा झाला! शाहूमहाराज मरण्याचा अवकाश कीं, पेशव्यांसुद्धां
हे सारे सरदार रामराजे, सकवारबाई, ताराबाई व संभाजीमहाराज या
चौघांपैकीं कोणाचे तरी नोकर आपणास म्हणवून घेणार, आणि
स्वच्छंदचारी राजे बनून एकमेकांच्या उरावर बसणार, या गोष्टी
अगदीं उघड उघड दिसत होत्या!
सर्व सरदारांत नानासाहेब पेशव्यांची शाहूमहाराजांवर भक्ति
विशेष होती. जेथें जेथें महाराजांविषयीं पेशव्यांनी पत्रव्यवहारांत
उल्लेख केला आहे तेथें तेथें त्यांच्या नांवामागें त्यांनी तीर्थस्वरूपहें उपपद लाविलें आहे. या पेशव्यांनीं एका प्रसंगीं महाराजांचे जोडे
उचलून घेतल्याचें एका बखरींत लिहिलें आहें तें वाचून एक अर्वाचीन ग्रंथकार यांवर हलकटपणाचा व तोंडपुजेपणाचा आरोप करितों,
पण हे नानासाहेब पेशवे महाराज वारल्यानंतर त्यांच्या पादुका देव्हाऱ्यांत ठेवून त्यांची पूजा करीत व ती कधीं अंतरीत नसत हें या
बापू व नानाफडनवीस यांनीं एकचित्तानें कारभार करण्याविषयीं शपथ घेतली असतां ती बाई मरण पावल्याबरोबर आपल्या मर्जीप्रमाणें वागण्यास बापूंस मुभा झाली. सवाई माधवरावांची पेशवाई राखण्याबद्दल नाना व परशुरामभाऊ यांमध्यें आणाशपथा झाल्या असतां ते पेशवे मरतांच याही दोघांचा एकोपा मोडून ते आपापल्या मताप्रमाणें राजकारणाचा नवीन डाव मांडण्यास उद्युक्त झाले. अशीं व्यक्तिप्राधान्याचीं आणखी पुष्कळ उदाहरणें देतां येतील. सातारकर व करवीरकर यांतून कोणा एकाचा पक्ष सोडून दुसऱ्याकडे मिळण्यांत पाप नाहीं, कारण दोघेही धनीच!निजामाचा किंवा हैदराचा पक्ष धरिला तर ती मात्र बेइमानी! सवाई माधवरावांस सोडून राघोबादादांस मिळण्यांत कांहीं दोष नाहीं, पण इंग्रजांशीं मिलाफ केला तर ती मात्र हरामखोरी! असला हा स्थूलमानाचा शास्त्रार्थ मात्र वरच्या उदाहरणांत प्रसिद्ध व्यक्तींनीं पाळला असे दिसतें.
९