राजानें कंपनीचें राज्य लेखणीच्या एका फटक्यासरशीं खालसा करून
टाकिलें आणि मराठयांच्या राजास सरदारांच्या मुलखापैकीं एखादा
तालुकासुद्धां तक्रारीखेरीज मिळण्याची मारामार!
महाराजांच्या ज्या सरदारांनी एवढें अवाढव्य नवीन राज्य संपादिलें ते प्रतिनिधि, दाभाडे, गायकवाड, भोंसले व पेशवे हे होत. या सर्वांत पेशव्यांचें प्राबल्य विशेष होतें. किंबहुना बाकीच्या सरदारांनीं जेवढें राज्य मिळविलें त्या जवळ जवळ तितकें एकट्या पेशव्यानीं मिळविलें होतें! आपल्या अभ्युदयाचा उगम महाराजांच्या कृपेपासून आहे हें ओळखून हें सर्व सरदार महाराजांशीं नम्रपणानें व आज्ञाधारकपणाने वागत, तें त्यांचे वर्तन औपचारिक होतें असें सर्वथा वाटत नाहीं. त्यांत भक्तीचा व कृतज्ञतेचा अंशही अर्थात् असला पाहिजे.एवढयावरून राज्यांतले हे व दुसरे सरदार शाहूमहाराजांशी जसे वागत होते तसेच ते रामराजांशीं वागतील असा कांहीं नेम नव्हता!स्वतः रामराजांत कांहीं राम नव्हता त्या अर्थीं नुसत्या पोकळ छत्रपतिपदास कोण जुमानणार? शाहूमहाराजांचें तेज, दरारा, सारें त्यांचे त्यांच्याबरोबर! त्यांशी इमानेइतबारें वागण्याबद्दल सरदारांनी घेतलेल्या आणाशपथा रामराजांशीं पाळण्यास हे सरदार बांधले गेले नव्हते! याचे कारण आम्हां पौरस्त्य लोकांचे राजकीय कारभार संस्थाप्रधान नसून ते प्रायः व्यक्तिप्रधान असतात.+ शपथ घेणारा
+ ताराबाई व त्यांचा पुत्र कैदेंत पडून करवीरास नवीन कारकीर्द सुरू झाल्याबरोबर कान्होजी आंग्रे शाहूमहाराजांशीं आपल्या सोयीप्रमाणें समेट करून घेण्यास मोकळे झाले. नानासाहेब पेशव्यांनी करवीरकर संभाजीमहाराजांशीं आज्ञाधारकपणानें वागण्याचा करार केला असतां ते महाराज वारल्याबरोबर करवीरच्या राज्याविषयीं त्यांची ती बुद्धि राहिली नाहीं. गंगाबाईची स्थापना करितेवेळीं सखाराम