पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(६३)
नारायणराव व्यंकटेश.

यांच्या कारभाऱ्यांनी शेंकडों सावकार गोळा करून त्यांजकडून कोटयवधि रुपये कर्ज मिळवलें व हजारों शिलेदारांस अनुकूल करून घेऊन लक्षावधि फौज गोळा केली. ती फौज घेऊन हे सरदार, सावकार व शिलेदार सर्व मिळून त्या त्या प्रांतांत जाऊन रात्रंदिवस मेहनत करून तेथच्या शत्रूंचा बामोड करून ते ते प्रांत काबीज करिते झाले. त्यांनीं वर्षानुवर्ष झगडारगडा चालवून हातचें पदरचें भरीस घालून व प्रसंगीं प्राणही खर्च करून हे प्रांत मिळविले, ते जर छत्रपति मागूं लागले तर ते त्यांस कसे मिळावे? या सरदार वगैरे लोकांचे सर्व नुकसान भरून देऊन व सावकारांचीं कर्जें फेडून प्रांत आपले ताब्यांत घेण्याचा त्यांस मार्ग होता, पण त्याला अगणित संपत्ति पाहिजे ती त्यांजवळ कोठें होती ? याकरितां कोणी सरदारानें एखादा प्रांत जिंकिला म्हणजे तोच त्याच्या फौजेच्या खर्चास सरंजाम म्हणून नेमून द्यावा, आणि हुजूर खर्चाकरितां कांहीं नियमित रक्कम त्याजपासून घेत जावी, असा शाहूमहाराजांनी प्रथमपासून प्रघात ठेविला होता. या योगानें सरदार लोकांस व कार्यकर्त्या पुरुषांस अधिक अधिक उत्तेजन येऊन ते राज्य यादवीत सुटले. शाहू महाराज नुसते महाराष्ट्रवादी नसून आपल्या पूर्वजांप्रमाणेच महत्तरराष्ट्रवादी होते; तो त्यांचा हेतु वर सांगिल्याप्रमाणे उत्तम प्रकारें सिद्धीस गेला! ते गादीवर बसले तेव्हां भीमा व कृष्णा या नद्यांमधला मुलूख देखील धडपणें त्यांच्या ताब्यांत नव्हता, पण मरणसमयीं त्यांच्या नांवाचा शिक्का काशीपासून रामेश्वरपर्यंत चालत होता! पण हें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे कीं, हें सारें राज्य सरदारानीं मिळविलें असून हे त्यांच्या पूर्ण ताब्यांत होतें. सुघटित व अव्यवस्थित राजसत्तेंतला फरक किती आश्चर्यकारक आहे! ईस्टइंडिया कंपनीचें राज्य व पेशव्यांचे वगैरें राज्य हीं एकाच नमुन्यावर बनलीं होतीं, पण इंग्रजांच्या