पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(६२)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

मुळीं उदयच झाला नसता! अशा दृष्टीनें विचार केला तर जें राज्य शिवाजीमहाराजांनी मिळविलें तें शाहूमहाराजांनी गमावलें असाच निष्कर्ष निघतो! कारण कीं हें संयुक्त-संस्थानिक-मंडळ शाहूमहाराजांनी मरणसमयीं निर्माण केलें, अथवा राज्याच्या स्थायिकपणासाठीं त्यांस ते निर्माण करावें लागलें, आणि त्याचा मुख्य अधिकार पंतप्रधानांच्या हवाली करावा लागला! हें सारें त्यांच्या आलस्याचें व अनास्थेचें फल होतें! आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांचा व त्यांनी स्थापिलेल्या राज्याचा शाहूमहाराजांस पराकाष्ठेचा अभिमान होता, तें राज्य वृद्धिंगत करण्याविषयीं त्यांचा उत्साह वर्णनीय होता, ते उदार, शूर,धार्मिक व प्रजावत्सल होते, याबद्दल वाद नाहीं. पण एवढे गुण अंगीं असले म्हणजे राजाच्या हातीं राज्य रहातें असें मुळींच नाहीं. राज्य हे करणाऱ्याचें आहे. भोगणाऱ्याचें राज्य नाहीं. स्वसुखाविषयीं निरपेक्ष होऊन राजानें प्रत्येक महत्वाच्या राजकार्यांत शरीर वं मन शिणवावें तेव्हांच त्याचें प्रभुत्व कायम रहातें. पहिल्या तीन महाराजांप्रमाणे स्वारीत हजर राहून अंगमेहनत व दगदग सोसून सरदार व फौज कह्यांत ठेवणें हें त्यांचे कर्तव्य होतें, पण तें त्यांस झेंपत नव्हतें व आवडतही नव्हतें! राज्य वाढविण्याचा तर हव्यास मोठा, आणि दगदग तर करावयास नको, अशी त्यांची स्थिति होती. त्यामुळें मोंगलांवर स्वाऱ्या करून त्यांचे मुलख जिंकण्याचें काम त्यानीं आपल्या सरदारांवर सोपविलें!
 गुजराथ, गोंडवण, नेमाड, माळवा, बुंदेलखंड, कर्नाटक, इत्यादि प्रांत काबीज करण्याविषयीं महाराजांनी पेशवे, भोंसले, दाभाडे यांस सनदा दिल्या तेव्हांच ते ते मुलूख त्या त्या सरदारांचे झाले! त्यांची त्यांवर मालकी उत्पन्न झाली ती महाराजांस काढून घेण्याचा या राहिला नाहीं. या सरदारांस सनदा मिळाल्याबरोबर यांनीं व