आहे. ही सरदारी मोठया योग्यतेची होती. शाहूमहाराज त्यांस सामोरे येत होते याला इंग्रज अंमलदाराची साक्ष आहे. त्यांचा ‘ममलकत मदार'हा किताब शाहूमहाराजानीं मान्य केल्याचें सरंजामजाबत्या- वरून स्पष्ट होतें. ज्या सात सरदारांस पेशवे खडी ताजीम देत होते यांत इचलकरंजीकर हे एक होते असें आम्ही वृद्ध माहीतगारांच्या तोंडून ऐकिलें आहे. व्यंकटरावानीं स्थापिलेली सरदारी मराठी राज्यांत पहिल्या प्रतीची होती हें जरी कोठें लिहिलेलें नाहीं, तरी इतिहासावरून ही गोष्ट निर्विवाद खरी ठरत आहे. प्रतिनिधि, दाभाडे, गायकवाड, नागपूरचे व अक्कलकोटचे भोसले वगैरे राज्यां- तले अव्वल दर्जाचे जे सरदार होते, त्यांचा शिरस्ता असा होता कीं, या स्वारीस पेशवे निघतील त्या स्वारीस त्यानीं बोलाविलें तरच खांशानीं जावयाचें; दुसरा कोणी सरदार स्वारीस निघाला तर त्यानीं स्वतः न जातां हाताखालच्या नोकरांबरोबर फौज मात्र चाकरींस पाठवावयाची; ज्या स्वारींत पेशवे हजर नसतील त्या स्वारींत ते गेलेच तर सर्व फौजेचे मुख्य अधिकारी तेच असावयाचे; असे त्या काळचे शिरस्ते होते, व हे सर्व शिरस्ते इचलकरंजीकरांस लागू होते हें इतिहासाचे मनन केलें असतां कोणाच्याही ध्यानांत येईल.
यापुढें नारायणरावतात्यांची कारकीर्द वर्णन करावयाची. ही कारकीर्द पंचवीस वर्षांच्या अवधीची असून तींत इचलकरंजी संस्था-