या राज्याला आतां परचक्राचें भय नाहीं, त्या अर्थी प्रतिनिधि,
सेनापति व अमात्य यांचीं प्रस्थं वाढविण्याचें कांही कारण नाहीं;
असल्या कल्पनाही बाईंच्या मनांत येणें स्वाभाविक आहे. कसेंही
असो, त्या काळापासून करवीरराज्याच्या मसलतींत प्रतिनिधि, अमात्य
व सेनापति जे एकदां निर्माल्यवत् झाले ते कायमचेच झाले! त्यांचे
अधिकार करवीरकर छत्रपतींस चालवावयाचे नसल्यामुळें त्यांचे हातून
कोणतेंही महत्वाचे कार्य घडलें नाहीं यांत आश्चर्य नाही. त्यांचे
सरंजामही खालसा व्हावयाचे, परंतु शाहूमहाराज व त्यांचे पंतप्रधान
यांस या करवीरच्या प्रधानमंडळीचा अभिमान असल्यामुळेंच ते
सरंजाम राहिले आहेत. प्रथम करवीरकरानीं जें हौसेने खेळणें म्हणून
गळ्यांत बांधून घेतलें तें पुढें लोढणें भासूं लागतांच भिरकाटून
देण्याचें त्यांच्या हातीं राहिलें नाहीं ! करवीर दरबाराचा व अमात्य,
प्रतिनिधि व सेनापति यांचा वारंवार बेबनाव होत असे याचें कारण
हें होय.
जिजाबाईंचा कारभार सुरू झाल्यावर करवीर दरबारानें
व्यंकटरावांजवळ इनाम तिजाई मागितली ती त्यानीं देण्याचे साफ नाकारिलें. यामुळे करवीराहून इ.स. १७४२ च्या मार्च महिन्यांत अर्जोजी यादव या नांवाचा सरदार फौजेसह येऊन त्यानें लाट या गांवावर स्वारी करून तेथील गुरें वळवून नेलीं. इचलकरंजीस नरसीपंत स. १७४२ म्हणून व्यंकटरावांचा दिवाण होता त्याने तें सर्व वर्तमान ऐकतांच मौजे रुई येथे स्वारी करून तो गांव जाळून तेथचीं गुरें वगैरे लुटून आणिलीं. त्या प्रसंगी लढाई झालीं तींत ३०|४० मनुष्यें ठार व जखमी झालीं. नंतर त्याच वर्षी भारी फौज़ व तोफा बरोबर घेऊन अर्जोजी यादव इचलकरंजीवर चालून आला, परंतु व्यंकटरावांच्या सरदारांनीं त्याचा पराजय करून
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/६३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(५३)
व्यंकटराव नारायण.