पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/५६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

त्यांस आपल्याबरोबर स्वारींत बाळगीत व त्यांस आपल्या धंद्यांत घालून आपल्या नजरेखालीं तरबेज करीत असत. स्वतः व्यंकटराव लहान होते तोंच त्यांचे वडिलांनीं देशमुखीचा मामला त्यांचे हवालीं करून व त्यांस त्र्यंबक हरि पटवर्धन हे दिवाण नेमून देऊन त्यांजकडून या वतनाचा कारभार कराविलास. १७३३ आतां नारायणराव वयांत येण्याच्या पूर्वीच व्यंकटरावांनीं तीच देशमुखी त्यांचेही हवाली केली, व त्र्यंबक हरि यांसच त्यांचे दिवाण नेमून दिलें.

 करवीरकर संभाजीमहाराजांनीं शाहूमहाराजाशीं तह केला तरी त्यांचा सोबती उदाजी चव्हाण यानें शाहूमहाराजाशीं लढाई चालू ठेविलीच होती. त्या चव्हाणाचें पारिपत्य होण्यास सन १७३१ पासून १७३९ पर्यंत शाहूमहाराजांस आठ वर्षे लागलीं. त्या अवधींत " चव्हाण तुमच्या गांवास कौल पाठवील तर तो तुम्ही कबूल करूं नये, व त्यास भेटावयास जाऊं नये, व त्याजकडील मनुष्यांस आपले गांवांत आसरा देऊं नये, " अशा अर्थाचीं पत्रें व्यंकटरावांस व इचलकरंजीच्या गांवकरांस बाजीराव पेशव्यांकडून आलेलीं आहेत.
 पिराजी घोरपडे यांस प्रांत मिरज व पन्हाळा येथील देशमुखीची सनद शाहूमहाराजांनीं दिलेली होती हें मागें सांगितलेंच आहे. पिराजीराव मरण पावल्यानंतर राणोजी घोरपड्यांस त्याचप्रमाणें सनद मिळावयाची; परंतु व्यंकटरावांवरस. १७३४शाहूमहाराजांची कृपा असल्यामुळे त्यांनी त्यांस आज्ञा केली कीं, देशमुखीचा भोगवटा अनेक वर्षे तुम्हीच करीत आलां आहां. आतां नवी सनद द्यावयाची तींत राणोजी घोरप-