पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३९ )
व्यंकटराव नारायण.

घोरपडेही सामील झाले होते! वास्तविक पाहिलें तर सहा वर्षांपूर्वी त्यांनीं शाहूमहाराजांची सरदारी पतकरिली असल्यामुळें त्यांच्या प्रतिपक्षास मिळण्याचें त्यांस कांहींच कारण नव्हतें. सभोंवतीं सर्व बाजूंनी संभाजीमहाराजांचे राज्य, आपण दूर एकटे पडल्यामुळें आपलीं काय चार खेडी आहेत तीं तत्काळ हातचीं जाऊन नाश होईल, या भयानें व संभाजीमहाराज व चव्हाण यांच्या धाकदपटशामुळेंच ते त्यांच्या फौजेंत हजर झाले असावे. असो.
 या फौजेच्या बळावर शाहूमहाराजांशीं लढण्याचा इरादा धरून संभाजीमहाराज वारणातीरीं येऊन राहिले. ती बातमी साताऱ्यास कळतांच शाहूमहाराजांनी त्यांवर श्रीपतराव प्रतिनिधींस मोठी फौज बरोबर देऊन पाठविलें.प्रतिनिधींनीं स. १७३०अकस्मात् येऊन संभाजीमहाराजांच्या फौजेवर छापा घातला. तेव्हां त्या फौजेची दाणादाण होऊन महाराज व चव्हाण पळून गेले. प्रतिनिधीनीं सर्व लष्कर लुटून फस्त केलें व हजारों लोक पाडाव केलें. त्या पाडाव सांपडलेल्या लोकांत ताराबाईं, राजसबाईं, रामचंद्रपंत अमात्य यांचे पुत्र भगवंतराव व व्यंकटराव घोरपडे या प्रमुख आसाम्या होत्या. यांपैकीं राजसबाईंस पन्हाळ्यास पोंचवून व बाकी तिघांस बरोबर घेऊन प्रतिनिधि साताऱ्यास परत आले. ताराबाईंस परत पाठविण्याचा शाहूमहाराजांचा विचार होता, परंतु मला कोठेंही झालें तरी कैदेंतच रहावयाचें त्या अर्थी तुम्हांजवळच रहातें, असें त्यांचे म्हणणें पडल्यावरून महाराजांनी त्यांस सातारच्या किल्ल्यावर राजवाडा होता तो दुरुस्त करून तेथें ठेविलें. त्या बाई करवीरास परत जात्या तर पुढें रामराजांची स्थापना वगैरे कित्येक गोष्टी झाल्या त्या झाल्या नसत्या व कदाचित् मराठी इतिहासास निराळेंच वळण लागलें असतें ! आपले सरदार शत्रूकडे