४ " राजश्री नारो महादेऊ, दिमत मशारनिल्हे, यानीं कष्ट
मेहनत बहुत केली या बाबे त्यांस कसबे भिलवडी सुभा प्रांत
मिरज हा गांव कुलबाब कुलकानू देखील इनाम करून दिला. ”
५ " मशारनिल्हेकडे वजारतमाब सरंजाम करून सरदार दिले.
१ संभाजी सोनोजी धारराऊ निंबाळकर. हजार फौजेचे
दौलत. जातीस तैनात होनू ३००० तीन हजार. २ वेंकटराऊ
नारायण पंचसदी (पांचशें) जमाव वागवावा. तैनात जातीस होनू २००० दोन हजार."
याप्रमाणें पांच कलमें या सरंजामजाबत्यांत लिहिलीं आहेत. ताराबाईंचा व घोरपडयांचा जर बिघाड असता तर छत्रपतींकडून असा सरंजामजबता पिराजीरावांस कधींच मिळाला नसता हें उघड आहे. या राजपत्रावरून नारो महादेव यांच्या कर्तृत्वाचें अनुमानही उत्तम प्रकारें होतें. कारण कीं, संताजीराव सेनापति दग्यानें मारले गेले व त्यांचे पुत्र राणोजी घोरपडे नुकते वयांत येतात तों एका लढाईत ठार पडले. याप्रमाणे घोरपडयांच्या घराण्यावर दुर्धर संकटें ओढवली असतांही नारो महादेव यांनी हिंमत धरून घोरपडयांची सरदारी इतक्या उत्तम रीतीने संभाळली कीं, आपले अल्पवयी धनी पिराजीराव यांच्या नांवें त्यांची वडिलोपार्जित वतनें छत्रपतींकडून त्यांस करार करून घेतां आली; व घोरपडयांचे दिमतीस दोन नवीन सरदार नेमून घेतां येऊन शिवाय त्यांत आपले अल्पवयी पुत्र व्यंकटराव यांची पांचशें स्वारांच्या सरदारीवर नेमणूक करून घेतां आली ! त्या वेळीं छत्रपतींच्या दरबारात नारो महादेव यांचें फार मोठे वजन असल्याखेरीज या गोष्टी घडणें अशक्य आहे हें स्पष्ट आहे.
सन १६९८ ते १७०५ पर्यंत बेदर, गुलबुर्गे व विजापूर या प्रांतीं घोरपड्यांची धामधूम व लुटालूट एकसारखी सुरू होती; व