पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१८३)
नारायणराव गोविंद.

 गोविंदराव आबासाहेब निपुत्रिक वारल्यामुळें संस्थानास मालक करण्याकरितां दत्तक घेणें आवश्यक झालें व तसें करण्याची सरकारांतून मंजुरी मिळाली. नंतर भाऊबंद मंडळीच्या मुलांपैकी दत्तक घेण्यास योग्य अशा मुलाची निवड करण्याचे काम सुरू झालें.मे.पोलिटिकल एजंटसाहेब यानीं सातं आठ मुलें गोळा केलीं होतीं त्यांत लक्ष्मणराव जोशी करकंबकर यांचा धाकटा मुलगा पांच सहा वर्षांचा गोपाळ म्हणून होता. हा मुलगा सर्वात तरतरीत व पाणीदार दिसून आल्यावरून एजंटसाहेबानीं याच मुलास पसंत केले. नंतर कै. आबासाहेब यांचें कुटुंब पद्मावतीबाई यांनी या मुलास ता. १० माहे ऑगस्ट सन १८७६ या दिवशीं दत्तक घेतलें व याचें नांव नारायणराव बाबासाहेब असे ठेविलें. दत्तकाच्या मंजुरीबद्दल करवीर सरकारास १७०००० रुपये नजराणा देण्यांत आला. बाबासाहेबांची मुंज मि. वैशाख शु० ६ शके १८०१ म्हणजे ता २७ एप्रिल सन १८७९ या दिवशी झाली.
 कोल्हापूरच्या राजाराम हायस्कुलांत सरदार लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नवीन वर्ग सुरू झाला होता त्यांत विद्याभ्यास करण्यासाठीं बाबासाहेब सन १८७६ च्या ऑगस्ट महिन्यांत कोल्हापुरास जाऊन राहिले. तेथें त्यानीं आस्थेनें मन लावून इंग्रजी सातव्या इयत्तेपर्यंत अभ्यास केला. सन १८८८ सालीं बाबासाहेब मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेंत पसार झाले.नंतर राजाराम कॉलेजांतच त्यांचा प्रीव्हियसच्या परीक्षेचा अभ्यास सुरू झाला. तेथें एक वर्षभर राहिल्यानंतर ते एल्फिन्स्टन कॉलेजांत अभ्यास करण्यासाठीं मुंबईस जाऊन राहिले. त्या कॉलेजांत प्रो.वर्डस्वर्थ या सुप्रसिद्ध विद्वान् अध्यापकाच्या शिक्षणाचा त्यांस लाभ झाला. मुंबईस असतां कॉलेजांतला अभ्यास बी.ए.पर्यंतचा करून शिवाय बाबासाहेबांनीं एल्.एल्.बी.च्या परीक्षेचाही