Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१६८)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

त्या प्रसंगीं निसबेटसाहेबांनीं तहाच्या शर्ती ठरवून महाराजांकडून त्या मान्य करविल्या.त्या शर्ती-
१ चिकोडी व मनोळी हे दोन तालुके सरकारानें दोस्तीखातर महाराजांस दिले होते, परंतु महाराजानीं दोस्ती राखिली नाहीं, सबब ते दोन्ही तालुके सरकारांत परत द्यावे. २ अकीवाटचें ठाणें व त्या जवळची १०००० रुपये उत्पन्नाची खेडी इंग्रजसरकारात द्यावीं. ३ जहागीरदार व शेजारी संस्थानिक यांच्या मुलखांत महाराजांनी लुटालूट केली आहे ती नुकसानी सरकार ठरवील त्याप्रमाणें भरून द्यावी.४ सरकारची फौज बंदोबस्ताकरितां करवीरास राहील व महाराजांस सल्ला देण्याकरितां एक इंग्रज अंमलदार राहील त्यांचा खर्च महाराजांनी चालवावा. ५ पन्हाळा, पावनगड व कोल्हापूर हीं स्थळें सरकारच्या ताब्यांत असावीं. ६ चारशें स्वार व आठशे पायदळ यापेक्षां अधिक फौज महाराजांनी कधी ठेवूं नये.
 याप्रमाणें सरकारानें तहाच्या शर्ती ठरविल्या त्या महाराजांनीं निमूटपणें मान्य केल्या. नंतर तहाची कलमें अमलांत आणण्यासाठी एक ब्रिगेड करवीरास ठेवून निसबेटसाहेब धारवाडास परत निघून गेले. हा तह ता.२३ ऑक्टोबर स०१८२७ रोजीं झाला.
 वरील प्रकार झालेले वाचिले असतां मागच्या किती मोठया गोष्टी व केवढी मोठी नांवें मनांत घोळूं लागतात ! करवीर राज्यांतली बंडाळी मोडण्याकरितां थोरले माधवराव पेशव्यांनी त्या राज्यांत आपल्या तर्फेचा कारभारी नेमावा म्हणून यत्न केला तो त्या वेळी सफळ झाला नाही, आणि आतां इंग्रजसरकारानें ती एकच गोष्ट