राजाज्ञा आले होते. रामचंद्रपंतआपा पटवर्धन यांचे विद्यमानें
बाबासाहेबानीं जनरल वेलस्ली यांस आपली हकीकत सांगितली, व
करवीरकरांचा आपणावर कसकसा जुलूम होत आहे हें त्यांच्या नजरेस आणून दिलें.सदरहू साहेबानीं बाबासाहेब व रत्नाकरपंत या दोघांसही सांगितलें कीं, इत उत्तर एकमेकांनीं लढाई करूं नये व बखेडा माजवूं नये. उभयतांच्या भांडणाचे मुद्दे काय आहेत हें समजून घेऊन आपण निकाल करूं त्याप्रमाणें दोघांनीही चालावें.रत्नाकरपंतांस वेलस्लीसाहेबांची मध्यस्थी नकों होती. पण बाबासाहेबांस तिची फारच जरूरी होती! परंतु सदरहू साहेब पुण्यास गेल्यावर शिंदे व भोंसले यांशी इंग्रजांचे युद्ध झालें त्यांत बरेच दिवस गुंतले. युद्ध आटपल्यानंतर परत म्हैसुराकडे जात असतां त्यांचा पूर्वीच्याच ठिकाणी मुक्काम पडला होता; परंतु या वेळीं त्यांस जाण्याची फार घाई असल्यामुळें मध्यस्थीचा विचार राहिला तो राहिलाच.
इ० स १८०४ पासून १८०६ पर्यंत बाबासाहेबानीं पुण्याच्या दरबारात आपलें गांव व वतन सुटावें आणि पूर्वीप्रमाणे आपल्या घराण्याचे हक्क व मनमरातब व सरदारी चालावी म्हणून खटपट केली. या सुमारास त्यांचें एकदां पुण्यास जाणें झालें असावें असें वाटतें. तो काळ कोणता होता व त्या काळचे प्रभु किती योग्यतेचे हें लक्षांत आणिलें म्हणजे बाबासाहेबांचा कोणताच हेतु सफल झाला नाही याचें नवल वाटत नाही.शिधोजीराव निंबाळकर म्हणून निपाणीचा देसाई होता तो फार प्रबळ होऊन पेशव्यांच्या आज्ञेवरून करवीरकरांस उपद्रव देऊं लागला. त्यानें कित्येक वेळां करवीरकरांशी युध्द करून त्यांचा पराजय केला, स्वाऱ्या करून त्यांचा मुलूख उद्वस्त केला. करवीरकरांच्या नेहमीं सुरू असणाऱ्या शिलशिल्यास बाबासाहेब फारच कंटाळले होते, सबब
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६०
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.