त्या देसायाची अशी सरशी झालेली पहातांच त्यांनी त्याचा आश्रय केला, तेव्हां करवीरकरानीं घेतलेले त्यांचे बहुतेक गांव परत सोडवून त्यास दिले.
निपाणीकराचा जोंपर्यंत आश्रय होता तोपर्यंत बाबासाहेबांस
कोल्हापूरकरांकडून त्रास कमी झाला हें खरें, पण स्वतः निपाणकर यांस पीडा देत नव्हता असें नाहीं ! त्यानें त्यांपासून वेळोवेळ खंडणी घेतली, आपल्या स्वारींत त्यांची फौज बळजबरीनें चाकरीस नेली, व त्यांच्या आजानें शिपूर हा गांव थोरले व्यंकटराव नारायण यांस इनाम दिला होता तो काढून घेतला ! पुढें ताें निपाणीकरही त्यांस आश्रय देईनासा झाला व करवीरकरानीं फौज आणून स० १८११ मध्ये इचलकरंजीस शह दिला. तेव्हां चिंतामणराव पांडुरंग ऊर्फ आपासाहेब पटवर्धन सांगलीकर यांच्या मध्यस्थीनें बाबासाहेबानीं करवीरकरांस १०००० रुपये नजराण दिला व देशमुखीच्या वतनाबद्दल ५० स्वार व १०० प्यादे बाळगून आपण तुमची चाकरी करूं असें लिहून दिलें. या प्रसंगीं जी यादी ठरली तींत महाराजांनीं कबूल केलें आहे कीं, इचलकरंजी संस्थानची जीं गांवखेडीं आपण घेतली आहेत ती सर्व परत सोडून देऊं. याप्रमाणें हा तूर्तचा प्रसंग टळून गेल्यावर उभय पक्षांचेही बोलणें कागदांतच राहिले ! कारण कीं, महाराजांच्या मनांत गांव सोडावयाचे नव्हते व बाबासाहेबांच्या मनांत तर करवीरकरांची चाकरी मुळींच करावयाची नव्हती !
पेशव्यांस पटवर्धन जुमानीत नव्हते. चिकोडी व मनोळी हे करवीरकरांचे तालुके निपाणकर देसायानें बळकाविले होते त्या तालुक्यांवर आपला वारसा आहे असें पेशवे प्रतिपादन करीत होते.कर
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६१
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१५१)
दुसरे नारायणराव व्यंकटेश.