पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१५७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४७ )
दुसरे नारायणराव व्यंकटेश.

भडिमार होत असतांही त्यांनी त्यांच्या फौजेवर बेजरब घोंडीं घातलीं, व त्यांस मोडून उधळून लाविलें, त्यांचा गोट लुटला, व दोन तोफा हस्तगत केल्या. तेव्हां हतवीर्य झालेल्या करवीरच्या फौजेनें थेट कर वीरचा रस्ता सुधारला ! या युद्धांत बाबासाहेबांस उजवें पायास जखम लागली होती. महाराजांचे दिवाण रत्नाकरपंत आजऱ्याचें ठाणें घ्यावयास गेले होते,तिकडे त्यांची अशीच दुर्दशा होऊन तेही परत करवीरास गेले.याप्रमाणें बाबासाहेबांस या प्रसंगीं जय मिळाला तरी करवीरकर आपल्यापेक्षां बलिष्ठ आहेत, यांशी नेहमीं दावा चालवून आपला निभाव लागणार नाहीं, हें त्यांस कळत नव्हतेंसे नाही. त्यांच्या संस्थानांपैकीं आतां इचलकरंजी व आजरें ही व आणखी एकदोन ठाणीं मात्र त्यांजकडे राहिली होती.बाकी मुलूख कोल्हापूरकरानीं घेतला होता व जो घेतला नव्हता तो लुटून जाळून ओसाड करून टाकिला होता ! पेशवाई हद्दींतील तैनातीचे वगैरे गांव व मिरज प्रांताच्या देशमुखी सरदेशमुखीचें वतन यापूर्वीच त्यांच्या हातून गेलें होतें हें मागें सांगितलेंच आहे. बाकीचा मुलूख करवीर राज्याच्या लगत्यास होता त्याची कोल्हापूरकरांनीं ही अशी दुर्दशा केंली होती ! आपणास आतां कोठेच आंधार नाही त्या अर्थी कोल्हापूरकराशी कसेंही करून समेट करून घ्यावा अशा हेतूने बाबासाहेबांनी त्यांशी आणखी एकदां समेटाचें बोलणें लाविलें. मागच्याप्रमाणेच याही वेळीं महाराजानीं नजराणा घऊन तुमचे गांव सोडितों,लूट परत देववितो व वतन सुरळीतपणें चालू करितों, असें नाना पाटणकर याचे विद्यमानें कबूल केलें; बाबासाहेबानीं नजराण्याची रक्कम तहाप्रमाणें दिली; परंतु महाराजानीं मात्र कबूल केल्यापैकीं कोणतीच गोष्ट केली नाहीं ! तहाप्रमाणें चालण्याविषयीं बाबासाहेबानीं खुद्द पेशव्यांचें पत्र आणून महाराजांस लाविलें, तथापि त्याची