पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१५६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

पलटणें आणून कोल्हापुरावर स्वारी केली. त्या संधींत बाबासाहेबांनीं रांगोळी व शिर्दवाडची वाडी करवीरकरांपासून परत घेतली.
 कोल्हापुरास शिंद्यांचीं पलटणें व पटवर्धन यांनीं वेढा घालून तें शहर जेर केलें, व पन्हाळ्याच्या पायथ्यास महाराजांची फौज होती तिजवर छापा घालून तिची दाणादाण केली. तें राज्य खालसा झालें नाहीं तरी अगदीच संपुष्टांत यावें असा त्या वेळीं रंग आला होता.परंतु या स्वारीचे पुरस्कर्ते नाना फडनवीस हे या संधीस मृत्यु पावले.आणि कोल्हापूरकरांनीं सर्जेराव घाटगे यांची मर्जी प्रसन्न करून घेतल्यामुळें त्यांनी पेशव्यांकडून कोल्हापूरकरांशीं तह करविला, व पलटणांस परत बोलाविलें. या पलटणांस घाटग्यांची आंतून सूचना आली होती कीं, परत येतांना रामचंद्रपंत आपा यांस पकडून पुण्यास आणावें ! ती गुणगुण रामचंद्रपंतांच्या कानीं आल्यामुळे ते पलटणांच्या हातून निसटून पळून गेले.
 पटवर्धन याप्रमाणें विपन्न स्थितीस घेऊन देशोधडीस लागले, आणि ता.१३ मार्च सन १८०० रोजी नाना फडनवीस मरण पावले, त्यामुळें बाबासाहेबांस पटवर्धनांकडून अथवा पुणे दरबाराकडून मदत मिळण्याची जी यत्किंचित् आशा राहिली होती तीही आतां नाहींशी झाली ! याउपर करवीकरांशीं झगडण्याचे काम त्यांस आपल्या बाहुबळावरच जसें होईल तसें पार पडून नेणे भाग पडलें.सन १८०१ च्या जूनमध्यें करवीरकर महाराज फौज व तोफखाना घेऊन पुनः स्वारीस आले, येतांच त्यांनी शिर्दवाड व नांदणी घेतली.ता.१२ ऑगस्ट रोजीं महाराजांचा इचलकरंजीस वेढा बसला.सामान्य प्रतीच्या एकदोन झटापटी होऊन उभयपक्ष थोडीबहुत नासाडी झाली. नंतर त्या महिन्याच्या २० व्या तारखेस खुद्द बाबासाहेब फौजसुद्धां महाराजांच्या तळावर चालून गेले. तिकडून तोफांचा