पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४१ )
दुसरे नारायणराव व्यंकटेश.

परंतु हल्लीं बाजीरावसाहेब पुण्याच्या गादीवर नवीनच बसले असून त्यांच्या अंगीं शौर्य व शहाणपण कांहींच नव्हतें. नाना फडनवीस यांच्या हातीं तूर्त जरी कारभार राहिला होता तरी तो कायमचा राहीलं असें त्यांस वाटत नसल्यामुळें ते बहुधा कारभाराविषयीं उदासीन असत. शिवाय पेशव्यांच्या मूर्खपणामुळें नानांच्या इच्छेप्रमाणें राज्य कारभार चालत नव्हता हेंही खरेंच. सारांश, पुणें दरबाराकडून इतःपर इचलकरंजीकरांस कुमक मिळण्याची फारशी आशा राहिली नाहींं. परशुरामभाऊ कैदेंत सांपडल्यामुळें पटवर्धन मंडळी दुर्बळ व निरुत्साह झाली होती. त्यांचाच जीव संभाळतां संभाळतां त्यांस पुरेसें झालें होतें. ते इचलकरंजीकरांस मदत कोठून करणार ? आणि अशा या आणीबाणीच्या वेळीं करवीरकरांची वावटळ इचलकरंजीवर येऊन आदळली ! या प्रसंगीं बाबासाहेबांनीं कोल्हापूरकरांशीं निरुपायाने जोशीराव व प्रीतिराव चव्हाण यांच्या विद्यमानें समेटाचें बोलणें लाविलें. तें मान्य केल्यासारखें दाखवून कोल्हापूरकर महाराजांनीं वचन दिलें कीं, सरदेशमुखीच्या वतनाची आम्हीं जप्ती केली आहे ती उठवितों. मात्र तुम्हीं आमच्या चाकरीस फौज पाठविली पाहिजे. आज पर्यंत इचलकरंजीकरांनीं कहापूरकरांची चाकरी कधींच केली नव्हती. परंतु आतां बाबासाहेब चाेहोंकडून कचाट्यांत सांपडल्यासारखे झाल्यामुळें त्यांनीं ती चाकरीची गोष्ट कबूल केली.कोल्हापूरकरांची स्वारी या वेळीं तासगांवावर होत होती तींत बाबासाहेबांनी आपले लोक व पागा चाकरीस पाठविली. या कामीं त्यांस वीस पंचवीस हजार रुपये खर्चही आला. परंतु कोल्हापूरकरांच्या मनांत दगा करावयाचा असल्यामुळें तासगावाहून परत येतांना त्यांनी नांदणी गांव लुटून फस्त केला, व लाट रांगोळींत ठाणीं घातलीं. इचलकरंजीची पागा बरोबर होती ती अडकावून लुटावयाचाही