पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/११०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१००)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

मिरजेंत गोपाळराव यांचे वडील गोविंद हरि होते ते किल्ला जेर झाला तेव्हां तो श्रीमंतांच्या हवालीं करून बाहेर पडले. गोपाळराव व दादासाहेबांवर रुसलेले दुसरें कित्येंक सरदार मोंगलांकडे गेले. नंतर त्या सरदारांसह मोंगलानें पेशव्यांच्या मुलखावर स्वारी केली. तें वर्तमान मिरजेच्या मुक्कामीं दादासाहेब व पेशवे यांस कळतांच त्यांनीही मोंगलाई मुलखावर स्वारी केली. त्या स्वारींत त्यांनी नारायणरावतात्यांस इचलकरंजीहून आणवून बरोबर घेतलें होतें. सुमारे सातआठ महिने ही लढाईची धामधूम सुरू होती. स. १७६३ स मोंगलाने पुणे जाळिलें व पेशव्यांनी बेदर शहर जाळिलें व औरंगाबाद व भागानगर या शहरांपासून खंडणी घेतली. नंतर मोगलांकडे रुसून गेलेल्या पटवर्धन वगैरे सरदारांची समजूत होऊन ते श्रीमंतांस येऊन भेटले. त्यामुळें मोंगलाचें बळ कमी झालें व स. १७६३ च्या अखेरीस राक्षसभुवन येथें लढाई होऊन त्याचा पराजय झाला व त्याशी तह होऊन पेशवे व दादासाहेब पुण्यास आले. मोंगलाई मुलख लुटण्याचे काम सुरू होतें, तेव्हां दोन तीन निरनिराळे प्रसंगीं श्रीमंतांनी नारायणरावतात्यांस स्वतंत्र कामगिरीवर पाठविलें होतें व त्यांनी थोडीबहुत खंडणीही वसूल करून आणिली होती.
 इकडे मोंगल व मराठे यांचें युद्ध सुरू असतां कर्नाटकांत हैदरअल्ली फार प्रबळ होऊन त्यानें धारवाडचा सुभा बहुतेक काबीज केला व सावनूरकरांचे राज्य घेतलें. त्या प्रसंगीं पेशव्यांच्या लष्करांतून निघून विसाजी नारायण धारवाडच्या सुभ्याचा कांहीं बचाव होईल तर पहावा म्हणून घाईघाईनें तिकडे गेला. पटवर्धनांचीही जहागीर या प्रांतींच होती म्हणून तिच्या बचावाकरितां मेघश्यामराव पटवर्धन हा त्याजबरोबर गेला होता. हे दोघे जाऊन पोंचण्यापूर्वी हरिराम धारवाड येथें होता तो व नरगुंदकर भावे व तोरगलकर शिंदे व खुद्द