पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगतीला कोण!' असं म्हणाली. बाकी काही नाही. अर्थात याला कारण माझ्या आई- बाबांना अनेक 'गे' मित्र आहेत. त्यामुळे मी 'गे' आहे हे सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया वाईट नव्हती." " अनेकजणांच्या पालकांकडून पहिली प्रतिक्रिया वाईट येते पण हळूहळू या धक्क्यातून आई-वडील सावरतात. आपल्या मुलाची लैंगिकता आपल्याला मान्य नसली तरी आपण एकमेकांना आधार दिला पाहिजे या जाणिवेने या विषयावर विचार करू लागतात. आपला मुलगा समलिंगी आहे या सत्याला सामोरं जातात. मुलानी आपली लैंगिकता कुणाला सांगायची, कोणापासून लपवून ठेवायची, त्यानी त्यांच्या घरी राहायचं का वेगळ्या ठिकाणी राहायचं अशा अनेक गोष्टींवर मुलाबरोबर चर्चा करू लागतात. मुला / पालकांमध्ये कोणत्या तडजोडी करता येतील याची बोलणी होतात. हे एक-दोन महिन्यात होत नाही. याला काही वर्षं जावी लागतात. पण हळूहळू त्यांच्यात बदल होतो. “सुरुवातीला घरच्यांना खूप धक्का बसला. आज चार वर्षांनंतर आई म्हणाली की, एक जोडीदार शोध ( पुरुष जोडीदार) आणि रहा त्याच्याबरोबर. एकटा किती दिवस राहणार आहेस?" O इंद्रधनु... ९३