पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लैंगिक विषयांबद्दल किती संवेदनशील आहे? ती व्यक्ती किती समजुतदार आहे? तिची या विषयावरील मतं काय आहेत? या सगळ्यांचा अंदाज लावला जातो. मित्र / सहकाऱ्यांना सांगणं मित्र/सहकारी यांना सांगण्याअगोदर त्यांची प्रतिक्रिया काय येईल याचा अगोदर अंदाज घ्यावा लागतो. सुरुवातीला बोलता बोलता हळूच या विषयाबद्दल अलिप्त वक्तव्य केलं जातं. उदा. काल 'माय ब्रदर निखिल' पाहिला. यावर काय प्रतिसाद. मिळतो हे ताडलं जातं. ऐकणाऱ्याला काहीच वाटलं नाही, समलिंगीद्वेष्टी भावना व्यक्त झाली नाही तर अधूनमधून या विषयावरची व्यक्तव्यं वाढविली जातात. मित्र / सहकाऱ्यानी समलिंगीद्वेष्टं विधान केलं तर पाऊल मागं घेतलं जातं. हे पाऊल टाकणं सोपं नसतं. एखाद्याला जर विश्वासात घेऊन सांगितलं तर आपली अपेक्षा असते की त्यांनी आपल्याला स्वीकारावं, आधार द्यावा. पण त्यानी त्याचा अर्थ असा काढला 'तू मला का सांगतोयस? तुला काय वाटतं मी तुझ्या सारखा आहे?' तर त्याच्या असुरक्षिततेमुळे त्याची प्रतिकिया खूप वाईट असू शकते. तो त्या समलिंगी व्यक्तीला झिडकारण्याची शक्यता असते. काही वेळा समलिंगी व्यक्ती आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याला सांगतो (की, त्याच्यावर प्रेम आहे). जर त्या मित्राने झिडकारलं तर हा मानसिक धक्का असह्य होऊ शकतो. त्यामुळे कुणालाही सांगताना त्याची वाईट प्रतिक्रिया काय असू शकेल याचा विचार व्हावा आणि मनाची तशी तयारी ठेवावी. तुम्ही किती ठामपणे तुमची लैंगिकता सांगता याला महत्त्व आहे. जर तुमच्या सांगण्यात अनिश्चितता असेल तर ती त्यांच्यापर्यंत पोहचते व ते तुमच्याकडे त्याच अनिश्चित नजरेने बघतात. तुम्हाला तुमच्या लैंगिकतेवर काही उपाय करायला सांगतात. मित्रांना आपली लैंगिकता कळल्यावर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. काही मित्र दूर जातात, तर काहींना भीती वाटते की, तो समलिंगी मित्र त्यांच्याकडे लैंगिकदृष्ट्या बघेल. काही मित्रांशी संगत टिकते पण आपली लैंगिकता सदैव त्यांच्या आणि आपल्यामधली दरी बनते. काही मित्र/मैत्रिणी त्यांच्या समलिंगी मित्राला / मैत्रिणीला पूर्णपणे स्वीकारतात; ज्याची त्याची लैंगिकता ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे असा विचार करतात. आई-वडिलांना सांगणं आई-वडिलांना सांगायचं असेल तर त्यातल्या त्यात कोण समजून घेईल? अनेक जणांना वाटतं की आई समजून घेईल पण प्रत्येकाने स्वतःचा अंदाज घ्यावा. " मी पहिल्यांदा आईला सांगितलं. तिला धक्का बसला तरी ती लगेच सावरेल हा अंदाज होता. वडील कधीच स्वीकारणार नाहीत याची कल्पना होती. माझा अंदाज इंद्रधनु... ९०