पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पात्र नको.' मला मनात खूप राग आला. त्याची बाजू घेतली तर मॅनेजरला माझ्याबद्दल शंका येईल या भीतीने गप्प बसलो. त्याची बाजू घेऊन मी बोललो नाही. मला माझ्या वर्तनाची आजही खूप लाज वाटते. जर तिशीपर्यंत लग्न झालं नसेल तर एच. आर. (Human Resources ) ची लोकं व इतरही सहकारी विचारतात, 'तुम्ही अजून लग्न का केलं नाही?', 'कधी करणार?', 'स्थळ मिळावायला मदत करू का?" अशा वेळी खोटं बोलावं लागतं, उत्तर टाळावं लागतं किंवा आपली लैंगिकता सांगावी लागते. 113 नोकरी लागल्यावर आपली लैंगिकता जाहीर केली (किंवा इतर लोकांकडून कंपनीच्या कानावर गेली) तर त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण कुठे नोकरी करतो आहोत यालाही महत्त्व आहे. जर कारखान्यात शॉप फ्लोअरवर एखादा कामगार समलिंगी आहे हे कळलं तर त्याला कदाचित त्याचे सहकारी त्रास देऊ शकतात. थट्टा, शिविगाळ कदाचित मारहाणसुद्धा... काही वेळा अशा त्रासाला कंटाळून समलिंगी व्यक्ती हातची चांगली नोकरी सोडून देते. "मी मध्ये काम करतो. मॅनेजमेंट अगदी उदारमतवादी आहे. त्यांना मी गे आहे हे माहीत आहे. पण माझे सहकारी मला त्रास देतात. माझी थट्टा करणं, माझ्या वस्तू लपवून ठेवणं अशा अनेक प्रकारे हैराण करतात. शेवटी मी वैतागून तक्रार केली. मॅनेजमेंटनी सगळ्यांना सांगितलं की असं जर परत झालं तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट अॅक्शन घेतली जाईल. तेव्हापासून हा त्रास थांबला. पण आता मला सगळ्यांनी पूर्णपणे वाळीत टाकलंय. मी माणूस नाही का? माझा लैंगिक कल सोडला तर माझ्यात आणि इतरांच्यात काय फरक आहे ?” सगळयानांच आपली लैंगिकता सांगून त्रास होतोच असं नाही. डॉ. राज राव म्हणाले, “मला हा प्रॉब्लेम नाही आला कारण भी लोकांच्या मनात समलैंगिकतेबद्दल जे गैरसमज आहेत, भ्रम आहेत ते दूर करीत असतो. लोकांना जे वाटतं की समलिंगी व्यक्ती ही फक्त सेक्ससाठी भुकेली असते, ती व्यक्ती जबाबदार वर्तणूक करू शकत नाही. हे सगळं मी खोडून काढलं. भी पुणे विद्यापीठात 'क्विअर स्टडीज सर्कल' (Queer Studies Circle) चालवतो. सगळ्यांना माहीत आहे की हा गट सिनेमातल्या, चित्रकलेतल्या, साहित्यातल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पैलूंचा लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो. हा ग्रुप काही डेटिंगसाठी जमत नाही. आपण अनेक वेळा शिक्षकांनी, अध्यापकांनी स्त्रियांची छेडछाड केलेली ऐकतो. माझ्या बाबतीत असं कधीही घडणार नाही. माझी समलैंगिकता हा खूप गंभीर विषय आहे असं मी मानतो व म्हणूनच माझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे. याच्यामुळेच माझ्या वाट्याला द्वेष आला नाही. फक्त प्रेम आणि आदर मिळाला. " इंद्रधनु