पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नैराश्य (Depression) नैराश्य आलं की काही करायची आकांक्षा उरत नाही. कशासाठी शिकायचं, नोकरी करायची कळत नाही. आपली लैंगिकता आपल्याला पूर्णपणे ग्रासते. आपल्याला कोणीही स्वीकारणार नाही, याच्या इतकी क्लेशदायक भावना दुसरी कोणती नसते. अनेक समलिंगी मुला/मुलींनी कधी ना कधी तरी आत्महत्येचा विचार केलेला असतो. काहींनी प्रयत्न केले असतात. काहीजण मरता मरता वाचतात. काहीजण आत्महत्या करून काळाच्या पडद्याआड जातात. “कुठल्या प्रकारे आत्महत्या करावी ? याचा मी विचार करू लागलो. घरच्यांना कमीत कमी त्रास होईल असा निरोप घेतला पाहिजे, असा विचार केला. चिठ्ठी लिहून ठेवली तर घरच्यांना कारण कळेल आणि त्यांना खूप दुःख होईल. त्यापेक्षा कारण न सांगताच गेलं पाहिजे. काय करायचं? विष घ्यायचं? का फास लावून घ्यायचा? लौकरात लौकर, कमीत कमी वेदना होऊन कशा प्रकारे आत्महत्या करता येईल याविषयीचे विचार मनात यायला लागले." काही वेळा एखाद्या समलिंगी व्यक्तीशी नातं जमतं. आपल्याला स्वीकारणारी जगातली ही एकमेव व्यक्ती असल्यामुळे तळमळीने त्या व्यक्तीवर प्रेम केलं जातं. चोवीस तास त्याच व्यक्तीचा ध्यास लागतो. तिच्याशिवाय दुसरं अस्तित्वच उरत नाही. अशा वेळी काही कारणांनी ती व्यक्ती नातं सोडून गेली तर हे दुःख असह्य होतं. आपल्याला स्वीकारणाऱ्या एकमेव व्यक्तीला सुध्दा आपण नको आहोत तर जगायचं कशाला? असा विचार मनात येतो. (त्यात जर दारू प्यायची सवय असेल तर नशेत मनावरचा ताबा सुटण्याचा धोका वाढतो. ) आपली लैंगिकता स्वतः मान्य करणं (Tolerance) काहीजण या सगळ्या अग्निदिव्यातून पार पडल्यानंतर स्वतःची लैंगिकता सहन करायची तयारी दाखवतात. आपण आहोत असेच राहणार, यात बदल नाही अशी खात्री होते. याला स्वीकारणं म्हणायचं का? नाही. कुठलाच उपाय उरला नसल्याने ही स्थिती येते. अनेकांचा प्रवास इथेच थांबतो. काहीजण मात्र याच्यापुढचे दोन महत्त्वाचे टप्पे गाठतात. आपली लैंगिकता स्वीकारणं (Acceptance) स्वतःला स्वीकारणारे समलिंगी लोक भेटले की, त्यांची जीवनशैली बघून स्वत:बद्दलचा व्देष कमी व्हायला लागतो. आपण इतरांपेक्षा कमी दर्जाचे नाही, आपण चारचौघांसारखे आहोत हे जसजसं लक्षात यायला लागतं तसतशी त्यांची स्वतःबद्दलची प्रतिमा बदलते. ते स्वत:वर प्रेम करायला लागतात. स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला लागतात. मन शांत व्हायला लागतं. एका इंद्रधनु... ७८