पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इन्सर्टिव्ह भूमिका घेणं चालेल पण त्याच्या बरोबर रिसेप्टिव्ह भूमिका घेणं लांछनास्पद वाटतं. मग असे अनेक रिसेप्टिव्ह भूमिका आवडणारे समलिंगी पुरुष, ते नेहमी इन्सर्टिव्ह रोल घेतात असं सांगतात. नंतर जसजसं समलिंगी समाजाशी परिचय वाढतो, काही जण मोकळेपणाने ते रिसेप्टिव्ह आहोत असं सांगतात, तसतसं धाडस करून काहीजण स्वतःला व्हरसटाइल म्हणायला लागतात; आणि नंतर यातले काहीजण मोकळेपणाने सांगतात की, त्यांना रिसेप्टिव्ह भूमिका घ्यायला जास्त आवडतं. “सुरवातीला माझा बॉयफ्रेंड टॉप आणि मी बॉटम असं नातं होतं. हळूहळू तो मला आग्रह धरायला लागला की, मी इन्सर्टिव्ह पार्टनर बनावं. मला इन्सर्टिव्ह रोल घ्यायला आवडत नाही पण आता तो सारखाच रिसेप्टिव्ह रोल घेतो." काही समलिंगी व्यक्तींशी बोलताना असं लक्षात येतं की त्यांना त्यांच्या समलैंगिकतेबद्दल इतका द्वेष आहे की, त्यांनी “मी लहानपणी लैंगिक शोषणाचा बळी झालो," असं काल्पनिक विश्व तयार केलं आहे. म्हणजे मला दोष देऊ नका, मी वाईट नाही. माझ्यावर ज्यांनी अत्याचार केला त्याला जबाबदार धरा, हा सांगायचा उद्देश. काहीजण आपल्या लैंगिकतेने होणारी कुचंबणा कोणाला कळू नये म्हणून एका खुशालचेंडूचा मुखवटा चढवून घेतात. विनोदबुद्धी दाखवून, थट्टामस्करी करून आपल्या मित्रगटाची जान बनतात. काहीजण अभ्यासात मन गुंतवून आपली लैंगिकता विसरण्याचा प्रयत्न करतात. राग हळूहळू आपण बदलणार नाही हे जाणवायला लागतं आणि मनात खूप चीड निर्माण होते. आपणच असे का? माझ्याच वाट्याला हे का आलं? मी काय पाप केलं आहे? परमेश्वरानी माझ्यावर का अन्याय केला? माझ्या आई-बाबांनी मला असं का जन्माला घातलं? ह्या रागाचं कारण कुणला सांगणं शक्य नसतं. त्यामुळे क्षुल्लक कारणांवरून चिडचिड, भांडणं, तोडफोड होते. बाकी सर्व जग सुखी आहे, आणि आपल्याच वाट्याला हे भोग आले आहेत म्हणून मनात इतरांबद्दल मत्सर उत्पन्न होतो. मित्रांचं चांगलं झालेलं बघवत नाही. आपण इतरांसारखे होऊ शकत नाही ही भावना मनात रुजली की काहीजणांचा स्वभाव एकलकोंडा बनायला लागतो. मित्र, मैत्रिणी नकोसे वाटू लागतात. अभ्यासातून, शिक्षणातून लक्ष दूर होत जातं. शिक्षणाचं वर्ष वाया जाऊ शकतं. आपल्या पाल्यात काय फरक पडला हे पालकांना कळत नाही. पालकांनी संवाद साधायची कितीही संधी दिली तरी त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. हळूहळू आई-वडिलांना राग आवरता येत नाही. सगळं पुरवून सुद्धा आपल्या मुला/मुलीला त्याची किंमत नाही असं त्यांना इंद्रधनु ७६ ...